अंधत्व रोखण्यासाठी AI चा वापर
ऑटोमेटेड रेटिनल डिसीज असेसमेंट किंवा ARDA, मध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजेच मधुमेही दृष्टिपटल विकाराचे निदान करण्यात आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. भविष्यात AI अल्गोरिदम वापरून चिकित्सक इतर विकारांचे निदान सुद्ध करू शकतील.
मधुमेही दृष्टिपटल विकारामुळे डोळयाच्या पडद्याच्या मागील बाजूस इजा होते ज्यामुळे संपूर्ण अंधत्व येऊ शकते. मधुमेहाचे निदान झालेल्या लोकांची लवकर तपासणी करणे महत्त्वाचे असते, पण संपूर्ण जगामध्ये ४२ कोटींपेक्षा अधिक लोकांना मधुमेह असल्यामुळे प्रत्येक रुग्णाची तपासणी करणे अशक्य आहे. आजाराबद्दल जागरूकता नसणे आणि त्याची तपासणी करण्यासाठी संसाधनांची कमतरता या दोन्ही मोठ्या समस्या आहेत.
द एज ऑफ A.I. मालिका, YouTube. Network Entertainment यांच्याद्वारे कॉपीराइट
मधुमेही दृष्टिपटल विकारासाठी स्क्रीनिंगच्या पद्धती तयार झाल्या आहेत
JAMA मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये, Google च्या कृत्रिम बुद्धिमत्तेने दृष्टिपटलाच्या स्कॅनची अचूक पाहणी करून मधुमेही दृष्टिपटल विकार शोधून काढले. असे करण्यासाठी, ओळख पटवणारी माहिती काढून टाकलेल्या १,००,००० पेक्षा जास्त दृष्टिपटल स्कॅनचे मॅन्युअली परीक्षण करून AI मॉडेलला प्रशिक्षण देण्यात नेत्रचिकित्सकांच्या मोठ्या टीमने Google सोबत काम केरून आम्हाला मदत केली. यामुळे ऑटोमेटेड रेटिनल डिसीझ असेसमेंट या नावाचे AI वर आधारित अॅप्लिकेशन तयार केले गेले. भारत आणि थायलंडसारख्या पुरेसे नेत्रोपचार तज्ञ नसलेल्या देशांमध्ये मधुमेही दृष्टिपटल विकाराचे उच्च दर्जाचे स्क्रीनिंग अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यात हे अॅप्लिकेशन डॉक्टरांना मदत करू शकते.
२ लाखांपेक्षा जास्त स्क्रीनिंग झालेल्या असून, ही संख्या आणखी वाढते आहे
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मधुमेही दृष्टिपटल विकार डिटेक्ट करण्यासाठी आमची पद्धत वापरण्यात येते आहे. ARDA वापरून दर आठवड्याला जवळपास ३ हजार नवीन स्क्रीनिंग केल्या जात असून, आम्ही मोठ्या प्रमाणावर मधुमेही दृष्टिपटल विकाराच्या स्क्रीनिंगची उपलब्धता वाढवीत आहोत. अमेरिकेत आणि थायलंडमध्ये सध्या चिकित्सालयीन अभ्यासांमध्ये या पद्धतीचे मूल्यमापन केले जात आहे. ही पद्धत जगभरात, विशेषतः तज्ञांच्या सेवा कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या भागांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी, आम्ही अनेक भागीदारांसोबत काम करत आहोत.
नवीन माहिती मिळताच आम्ही ती शेअर करतो
वैद्यकीय क्षेत्रातील AI नवनवीन प्रकारे मदतीला येत असताना, ARDA च्या वापराचा आमचा अनुभव शेअर करण्यासाठी आम्ही नेचर मेडिसिन या नियतकालिकामध्ये याबाबत पेपर प्रकाशित केला आहे. AI तयार करण्या पासून ते वापरण्यापर्यंतच्या प्रवासादरम्यान आम्हाला समजलेल्या महत्त्वाच्या गोष्टी शेअर करून, सर्वांसाठी आरोग्यसेवेमध्ये सुधारणा करणारी वैद्यकीय AI टूल तयार करण्यात इतरांना मदत होईल अशी आम्हाला आशा वाटते. पोस्ट वाचा.