मॅमोग्राफीमधील AI
आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून स्तनाच्या कर्करोगासाठीच्या स्क्रीनिंगमध्ये सुधारणा करणे
रेडिओलॉजिस्टना स्तनाचा कर्करोग आणखी अचूकपणे, जलद रीतीने आणि सुसंबद्ध पद्धतीने उघडकीस आणण्यात मदत करू शकणारी, मॅमोग्राफीसाठीची AI सिस्टीम तयार करण्याकरिता आम्ही चिकित्सक, रुग्ण व भागीदारांसोबत काम करत आहोत.
दर वर्षी २० लाखांहून अधिक लोकांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते
स्तनाचा कर्करोग हा जगभरातील सर्वात सामान्य प्रकारचा कर्करोग आहे आणि स्तनाच्या कर्करोगासाठीच्या स्क्रीनिंगद्वारे तो लवकर माहित झाल्याने त्यातून वाचण्याची शक्यता वाढू शकते. परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्क्रीनिंग महत्त्वाचे असले, तरीही जगभरातील विशेषज्ञांच्या कमतरतेमुळे तपासणी सिस्टीमवरील भार हा बरेचदा जास्त असतो, ज्यामुळे निकालांची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना खूप वेळ चिंतेत वाट पाहावी लागते.
आमचे संशोधन असे दर्शवते, की AI हे एखाद्या रेडिओलॉजिस्टइतक्याच अचूकतेने स्तनाच्या कर्करोगाचे निदान करू शकते
स्तनाचा कर्करोग लवकर आणि आणखी सुसंबद्ध पद्धतीने ओळखण्यात रेडिओलॉजिस्टना मदत करण्यासाठी, स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणी वर्कफ्लोमध्ये ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे प्रायोजित सिस्टीम इंटिग्रेट होते. आमचे प्रकाशित केलेले संशोधन असे दर्शवते की आमचे तंत्रज्ञान हे प्रशिक्षित रेडिओलॉजिस्टप्रमाणेच स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखू शकते.
अनामित केलेल्या हजारो मॅमोग्रामच्या मदतीने AI-सिस्टीमला प्रशिक्षण दिले जाते
कर्करोगाची लक्षणे दाखवत असू शकतात अशी मॅमोग्राममधील क्लिष्ट वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी, हे मॉडेल Google चे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरते. परिणामी, ही सिस्टीम अशी लक्षणे ओळखू शकते, जी काही विशेषज्ञांना कदाचित दिसणार नाहीत. आम्हाला अशा आहे, की मानवी आणि AI च्या क्षमता एकत्रित करून आम्ही भविष्यामध्ये कर्करोग उघडकीस आणण्यामध्ये सुधारणा करू शकतो.
रुग्ण, चिकित्सक आणि आरोग्य व्यावसायिक हे आमच्या कामात मार्गदर्शन करतात
आम्ही मॅमोग्राफीसाठी AI कसे डिझाइन करतो, त्याची चाचणी कशी करतो आणि त्याची अंमलबजावणी कशी करतो याविषयी माहिती व सल्ला देणारा आमचा सार्वजनिक सहभाग फोरम याच्या मदतीने डेला ओगनलाय यांच्या सहभागाविषयी अधिक जाणून घ्या.
प्रत्यक्ष रुग्णांच्या आणि चिकित्सकांच्या मदतीने या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी आम्ही भागीदारांसोबत काम करत आहोत
जास्त धोका असलेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात आणि तपासणी केलेल्या व्यक्तींच्या निदानासाठी लागणारा वेळ कमी करण्यात संशोधन मॉडेल कशा प्रकारे मदत करू शकते याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही नॉर्थवेस्टर्न मेडिसिन सोबत काम करत आहोत.
संशोधन मॉडेल हे यूकेमध्ये डबल रीड स्क्रीनिंग सिस्टीममध्ये “दुसरे स्वतंत्र रीडर” म्हणून काम करून, रेडिओलॉजिस्टना तपासणी मधील सुसंबद्धतेत आणि गुणवत्तेत सुधारणा करण्यासोबतच उच्च प्राधान्य असलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करू देऊ शकते का हे समजून घेण्यासाठी आम्ही NHS AI अवॉर्ड याद्वारे इंपिरियल कॉलेज लंडन व तीन NHS ट्रस्टसोबत काम करत आहोत.
भागीदारीद्वारे संशोधनाला सत्यात उतरवणे
मॅमोग्राफीमधील आमचे AI तंत्रज्ञान लवकरात लवकर चिकित्सालयांमध्ये वापरले जावे, यासाठी आम्ही iCAD यांसारख्या आघाडीच्या भागीदारांसोबत काम करत आहोत. iCAD आमच्या तंत्रज्ञानाची पडताळणी करून त्यांच्या ProFound ब्रेस्ट हेल्थ स्वीट मध्ये त्याचा समावेश करेल, जेणेकरून ते जगभरातील रुग्णांसाठी उपलब्ध होईल.
कर्करोगाचे प्रकार आणि परिणाम हे लोकसंख्येनुसार बदलतात
स्तनाची घनता वंशानुसार आणि वांशिकतेनुसार बदलते, त्यामुळे वंश किंवा वांशिकता कोणतीही असली, तरीही सर्वांसाठी प्रभावी व समावेशक टूल तयार करताना आमचे डेटासेट हे विविध लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
आमच्या मॉडेलच्या समावेशकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी, आम्ही अरीयाके हॉस्पिटल येथे जॅपनीज फाउंडेशन फॉर कॅन्सर रिसर्च (JFCR) सोबत भागीदारी करत आहोत आणि आम्ही आमची उत्पादने अधिक प्रातिनिधिक कशी बनवू शकतो हे शोधत आहोत.
जॅपनीज कॅबिनेट ऑफिस यांच्या स्ट्रॅटेजिक इनोव्हेशन प्रमोशन प्रोग्राम “AI हॉस्पिटल” या उपक्रमाचे डिरेक्टर आणि द कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ JFCR यांचे सल्लागार
“स्तनाचा कर्करोग हा असा कर्करोग आहे, जो सुरुवातीच्या टप्प्यावर आढळल्यास, त्यावर उपचार करून तो बरा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. अनेक लोकांनी वैद्यकीय तपासणी केली, तरीही कर्करोगाच्या स्क्रीनिंगसाठी AI तंत्रज्ञान वापरून, आम्ही निदानाची अचूकता कायम ठेवू शकतो आणि रेडिओलॉजिस्टवरील भार कमी करू शकतो.”