Google Health च्या आरोग्य सेवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमागील तज्ञांना भेटा

वैज्ञानिक उत्कृष्टता, मानवकेंद्री तंत्रज्ञाने आणि विश्वासू आधारभूत संरचना यांद्वारे आरोग्याचे भविष्य बदलण्यासाठी आमची तज्ञांची टीम वचनबद्ध आहे. आमच्या टीमच्या सूचीमध्ये इंजिनियर, डिझायनर, चिकित्सक, संशोधक आणि यांदरम्यानच्या सर्व लोकांचा समावेश आहे, जे प्रत्येकाला दर दिवशी अधिक दर्जेदार जीवन जगण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहेत. तसेच आम्ही आमची उत्पादने कशी तयार करतो यापासून आम्ही आमच्या कर्मचारीवर्गाला कशाप्रकारे प्रशिक्षित करतो यापर्यंत, आमच्या केंद्रस्थानी विविधता, समन्याय आणि समावेश यांसाठी समर्पण आहे.

जगाच्या नकाशाचे बिंदू इलस्ट्रेशन

आरोग्याच्या क्षेत्रामध्ये तज्ञांची मदत

नवीन उत्पादनांपासून संशोधनापर्यंत, Google Health चे सर्व उपक्रम हे स्वतःच्या क्षेत्रांत तज्ञ असलेल्या चिकित्सकांसोबत निकट सहयोग करून डिझाइन आणि डेव्हलप केले गेले आहेत. आमच्या टीमकडे चिकित्सालयीन व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, आरोग्य अर्थशास्त्रावरील संशोधन आणि वैद्यकामधील AI व मशीन लर्निंगचा अनेक दशकांचा अनुभव आणि कौशल्य असल्यामुळे Google Health उपक्रम सर्वोच्च चिकित्सालयीन मानकांचे पालन करत असल्याची खात्री होते.

डॉ. कॅरन डिसाल्व्हो यांचा फोटो
डॉ. कॅरन डिसाल्व्हो यांचा फोटो

डॉ. कॅरन डिसाल्व्हो

मुख्य आरोग्य अधिकारी

डॉ. कॅरन डिसाल्व्हो या वैद्यक, सार्वजनिक आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संगमावर काम करणार्‍या चिकित्सक एक्झिक्युटिव्ह आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आरोग्यात सुधारणा करणे व असमानतांचे निर्मूलन करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या Google येथे समावेशक संशोधन, उत्पादने आणि सेवांच्या डेव्हलपमेंटसाठी मार्गदर्शन पुरवणार्‍या आरोग्य व्यावसायिकांच्या टीमचे नेतृत्व करतात. त्या Google च्या COVID संबंधी प्रतिसाद टीमच्या भाग राहिल्या आहेत. Google मध्ये सामील होण्यापूर्वी, डॉ. डिसाल्व्हो या ओबामा प्रशासनामध्ये आरोग्य माहिती तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय समन्वयक आणि आरोग्यासाठी साहाय्यक सचिव (प्रभारी) होत्या. यू.एस. च्या आरोग्य आणि मानव सेवांच्या विभागामधील त्यांच्या काळादरम्यान, डॉ. डिसाल्व्हो यांनी अधिक ग्राहकाभिमुख, पारदर्शक व मूल्याधारित आरोग्य व्यवस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. हरिकेन कट्रिनानंतर डॉ. डिसाल्व्हो यांनी न्यू ऑर्लिन्स आरोग्य आयुक्त म्हणून सेवा बजावली. त्यापूर्वी त्या टूलेन स्कूल ऑफ मेडिसिन येथे समुदाय व्यवहार आणि आरोग्य धोरणाच्या व्हाइस डीन होत्या, जेथे त्या व्यावसायिक अंतर्गत वैद्यक चिकित्सक, शिक्षक, संशोधक आणि प्रमुख होत्या. त्या नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिनच्या काउन्सिलवर काम करतात.

डॉ. मायकल हॉवल

डॉ. मायकल हॉवल

मुख्य चिकित्सालयीन अधिकारी आणि उपमुख्य आरोग्य अधिकारी

डॉ. मायकल हॉवल यांचे करिअर हे आरोग्यामध्ये सुधारणा करण्यात तंत्रज्ञान कशी मदत करू शकते यासह, सेवेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि अनुभव यांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करते. ते आरोग्य सेवा वितरण विज्ञानाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेले तज्ञ असून, त्यांनी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल, मेडिकेअर आणि नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिन यांच्या सल्लागार पॅनलवर काम केले आहे. इतर संशोधकांनी १०,००० पेक्षा जास्त वेळा संदर्भ दिलेल्या त्यांच्या लेखनाचा या क्षेत्रावर प्रभाव पडला आहे आणि अनेक राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्याचा अंतर्भाव केला गेला आहे. ते फुफ्फुसांच्या रोगांचे आणि गंभीर आजारांसंबंधी सेवांचे चिकित्सक असून, हार्वर्ड आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे त्यांनी चीफ क्वालिटी ऑफिसर म्हणून अनेक वर्षे रुग्णसेवा देखील केली आहे.

बकुल पटेल

बकुल पटेल

वरिष्ठ संचालक, वैश्विक डिजिटल आरोग्य धोरण आणि नियमन

बदलत्या जागतिक नियामक आवश्यकतांना अनुसरून असलेले सर्वसमावेशक डिजिटल आरोग्य धोरण तयार करण्यावर बकुल पटेल यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तंत्रज्ञानाची क्षमता आणि उच्च गुणवत्तेच्या, समानता असलेल्या आरोग्य सेवेचा अ‍ॅक्सेस सर्व लोकांना उपलब्ध करून देण्यातील त्याची भूमिका अमलात आणण्यात मदत करणे हे श्री. पटेल यांचे ध्येय आहे. Google मध्ये काम करण्यापूर्वी, श्री. पटेल यांनी यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) मध्ये चीफ डिजिटल हेल्थ ऑफिसर ऑफ ग्लोबल स्ट्रॅटेजी अँड इनोव्हेशन आणि डिरेक्टर फॉर डिजिटल हेल्थ सेंटर ऑफ एक्सेलन्स ही पदे सांभाळली आहेत. या पदांवर असताना त्यांनी वैचारिक नेतृत्वाद्वारे आणि कौशल्याद्वारे डिजिटल आरोग्यासाठीचे जबाबदार नियमन विकसित केले. श्री. पटेल यांनी “सॉफ्टवेअर ॲझ अ मेडिकल डिव्हाइस” (SaMD) या संज्ञेचा परिचय करून दिला आणि जगभरातील वैद्यकीय डिव्हाइस नियामकांसाठी रिस्क फ्रेमवर्क तयार केले. त्यांनी सॉफ्टवेअ

लारा गार्सिया

लारा गार्सिया

आरोग्य अनुपालन धोरण आणि व्यवसाय निराकरणे लीड

लारा या आरोग्यविषयक पालनासंबंधित १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या हेल्थ कंप्लायन्स लीड आहेत. Google मध्ये काम करण्यापूर्वी, त्यांनी आरोग्यासंबंधित टॉप Fortune 500 आरोग्यविषयक कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर पालनासंबंधित भूमिका बजावल्या आहेत. इनोव्हेटिव्ह कंप्लायन्स प्रोग्राम डिझाइन आणि डिलिव्हरीद्वारे विश्वास व एकनिष्ठता वाढवण्यास समर्पित जागतिक टीमचे त्यांनी यशस्वीरीत्या नेतृत्व केले आहे. तसेच, लारा यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात आरोग्य सेवेसंबंधित दोन नवोदित स्टार्ट-अपमध्ये केली. लारा यांनी त्यांची मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस येथून आणि बॅचलर ऑफ सायन्स इन मायक्रोबायोलॉजी ही पदवी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन दिएगो येथून मिळवली आहे.

डॉ. सोहिनी स्टोन

वैश्विक कर्मचारी आरोग्याच्या मुख्य मेडिकल अधिकारी

डॉ. सोहिनी स्टोन, एमडी, एमबीए, या Google मधील ग्लोबल एम्प्लॉयी हेल्थ टीमच्या प्रमुख आहेत. ही टीम Google चे कर्मचारी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य व त्यांच्या सभोवतालचा समुदाय यांच्यासाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याशी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये आरोग्य आणि कल्याण प्रमोट करण्यासाठी निष्पक्ष, पुराव्यावर आधारित प्रोग्राम व सेवा यांचा इंटिग्रेट केलेला पोर्टफोलिओ देऊ करण्याच्या क्रॉस-कंपनी उपक्रमावर लक्ष देते. डॉ. स्टोन यांना गुणवत्ता, रुग्णाची सुरक्षितता आणि प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचा अनुभव आहे. Google सोबत काम करण्यापूर्वी त्या सिलिकॉन व्हॅलीमधील एका हेल्थ स्टार्ट-अपमध्ये चिकित्सालयीन, गुणवत्तेशी संबंधित आणि व्यावसायिक विश्लेषणाच्या टीमच्या प्रमुख होत्या. डॉ. स्टोन यांनी त्यांची वैद्यकीय पदवी आणि व्यवसाय प्रशासनामधील पदव्युत्तर पदवी अशा दोन्ही बॉस्टन विद्यापीठामधून मिळवल्या आहेत, तसेच त्यांनी डार्टमथ मेडिकल स्कूलमध्ये पीडियाट्रिक्स रेसिडन्सी पूर्ण केली असून स्टॅनफर्ड/ ल्यूसील पॅकार्ड चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे निओनॅटल-पेरिनॅटल मेडिसिन फेलोशिप केली आहे.

एमी मॅकडॉना

व्यवस्थापकीय संचालक, धोरणात्मक आरोग्य निराकरणे

आरोग्य-सेवांना मोठ्या प्रमाणावर प्रभावित करण्याचे आणि नवीन विचारांना गती देण्याचे काम करणारे उपाय निर्माण करण्यासाठी सहभागितेची शक्ती एमी ओळखून आहेत. धोरणात्मक आरोग्य निराकरणे टीमचे सदस्य उद्योग जगतातील अनुभव आणि बुद्धिमत्ता आमच्या उत्पादन रोडमॅपमध्ये आणतात ज्याने याची खात्री होते की आम्ही Google च्या तंत्रज्ञानाचा आणि टूलचा सर्वात योग्य आणि सर्वोत्कृष्ट वापर करीत आहोत. यामुळे जगभरातील अब्जावधी लोकांचे आरोग्य सुधारते. एमी यांनी मजबूत पाया निर्माण करणारी Fitbit हेल्थ सोल्यूशन्सची टीम स्वतः उभी केली होती ज्यावर SHS ची इमारत उभी आहे. या टीमने आरोग्य सेवेच्या इकोसिस्टमसोबत काम करून आरोग्य सेवांमध्ये आणि त्याच्या परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणली. Fitbit मध्ये येण्यापूर्वी एमी CNET Networks मध्ये धोरणात्मक पदांवर होत्या जिथे त्यांनी स्ट्रॅटीजिक सहभागिता आणि ऑडियंस आणि काँटेंट वाढवण्यावर काम केले होते. एमी यांनी नॉर्थ अँडोव्हर, मॅसाच्युसेट्स येथील मेरिमॅक कॉलेजमधून बॅचलरची पदवी मिळवली आहे, तसेच यूसी बर्कले येथून इंटीग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन्समध्ये प्रोफेशनल सर्टिफिकेटसुद्धा मिळवले आहे.

डॉ. हेदर कोल-लुईस

आरोग्य समन्यायाच्या जागतिक प्रमुख

पीएचडी, एमपीएच, एमए असलेल्या हेदर कोल-लुईस या २०२२ पासून Google मध्ये आरोग्य समन्यायाच्या प्रमुख आहेत. डॉ. कोल-लुईस या डिजिटल आरोग्य आणि जबाबदार AI यांमधील तज्ञ असून, व्यक्ती व त्यांची परिस्थिती यांबद्दल सखोलपणे समजून घेऊन लोकांच्या जीवनामध्ये सुधारणा करण्यासाठी उत्कटतेने काम करत आहेत. व्यावहारिक संशोधन आणि उत्पादन विकास यांमधील कौशल्यांसह, प्रयोगांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी त्या सामाजिक विज्ञान, मानव व काँप्युटरमधील संवाद आणि डेटा सायन्स यांमधील पद्धती एकत्र करतात. त्यांनी तंत्रज्ञान, औषधनिर्माण, पॅकेज केलेल्या उपभोक्ता वस्तू, स्टार्टअप, सरकारी सल्लागार आणि जागतिक आरोग्य विकास यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आरोग्यासंबंधित तंत्रज्ञान व AI उपक्रमांचे यशस्वी नेतृत्व केले आहे. Google मध्ये सामील होण्यापूर्वी, डॉ. कोल-लुईस यांनी Johnson & Johnson इथे वर्तणूक विज्ञान विभागाच्या संचालक आणि आरोग्य समन्याय गुंतवणूक यासाठी जागतिक प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांनी येल युनिव्हर्सिटीमधून दीर्घकालीन आजार साथरोगशास्त्र यामध्ये पीएचडी, एमरी युनिव्हर्सिटीमधून वर्तणूक विज्ञान यामध्ये एमपीएच आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून जीववैद्यकीय माहितीशास्त्र यामध्ये एमए केले आहे.

संशोधन, प्रयोग आणि शोध यांद्वारे नवप्रवर्तन

परिवर्तनकारी आरोग्य सेवा तंत्रज्ञाने ही नावीन्यपूर्ण स्थानांतरणीय संशोधनावर अवलंबून असतात. Google Health येथे, जेथे वैज्ञानिक हे उत्पादन आणि इंजिनियरिंग टीमसोबत एकत्रितपणे काम करतात अशा एंबेड केलेल्या संशोधन आणि डेव्हलप मॉडेलचा आम्ही अंगीकार केला आहे. आमचा अंगभूत सहयोगात्मक आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोन हा विविध पार्श्वभूमी आणि कौशल्य असलेल्या, चिकित्सालयीन विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहितीशास्त्र आणि वापरकर्त्यावर केंद्रित डिझाइन यांच्या सीमा पार करू शकणार्‍या संशोधकांसाठी नैसर्गिकपणे अनुरूप आहे.

डॉ. जो लेडसम यांचा फोटो

डॉ. जो लेडसॅम

चिकित्सालयीन प्रमुख, जपान

डॉ. जो लेडसॅम हे जपानमधील Google Health चे नेतृत्व करतात, जिथे ते Google च्या उत्पादनांमधील AI संशोधन, डिजिटल आरोग्य आणि आरोग्य या विषयांवर काम करतात. त्यांनी वैद्यकीय AI, जीनोमिक्स आणि औषधांचा शोध यासंबंधी संशोधनाचे नेतृत्व केले आहे. ते संशोधन नेचर, नेचर मेडिसिन आणि नेचर मेथड्स अशा जर्नल्समधून प्रकाशित झाले आहे. जपानला जाण्यापूर्वी, त्यांनी DeepMind आरोग्य संशोधन टीम तयार करण्यात मदत केली आणि Google DeepMind मध्ये जीनोमिक्स टीम स्थापन करून त्याचे नेतृत्व केले. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, यूके इथून वैद्यकीय पदवी मिळवली, जिथे त्यांनी अनेक जपानी रुग्णालयांसोबत झालेल्या संशोधनांचे नेतृत्व केले आणि त्यांच्या चिकित्सालयीन प्रशिक्षणादरम्यान ते युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन इथे संशोधन फेलो होते.

डॉ. युआन लिऊ यांचा फोटो

डॉ. युआन लिऊ

सॉफ्टवेअर इंजिनियर

डॉ. युआन लिऊ या Google Health येथे चर्मरोग चिकित्सा टीममध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. अचूक माहितीचा जगाला असलेला अ‍ॅक्सेस आणि प्रत्येकासाठी सेवा यांमध्ये सुधारणा करण्यासाठी AI असिस्टंट टूल तयार करण्यावर लक्ष केंद्रित करून, त्या सध्या चर्मरोग चिकित्सेशी संबंधित विविध संशोधन आणि डेव्हलपमेंट उपक्रमांचे नेतृत्व करतात. वापरकर्त्यांनी Google Maps मध्ये मोठ्या प्रमाणात जनरेट केलेल्या मजकूरला काँप्युटर व्हिजन तंत्रे लागू करण्याबाबतदेखील त्यांनी काम केले. Google मध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी येथून मेडिकल इमेज प्रोसेसिंगमध्ये PhD मिळवली, जेथे त्यांनी इमेज-गाइडेड न्युरोसर्जिकल पद्धतींमध्ये प्रगती साधण्यासाठी रेडिऑलॉजी इमेजचे (CT, MRI) इंटेलिजंट विश्लेषण केले. त्या सध्या CVPR येथे आगामी ISIC स्किन इमेज अ‍ॅनॅलिसिस वर्कशॉपसाठी उपाध्यक्ष म्हणून आणि त्वचा इमेज विश्लेषणाबाबत आगामी विशेषांकासाठी अतिथी संपादक म्हणून काम करत आहेत.

डॉ. एरिक टीझ्ली यांचा फोटो

डॉ. एरिक टीझ्ली

तांत्रिक प्रोग्राम व्यवस्थापक

डॉ. एरिक टीझ्ली हे Google Health येथे मोबाइल परिमाणे आणि आरोग्य समन्याय टीममध्ये भूमिका बजावणारे तांत्रिक प्रोग्राम व्यवस्थापक आहेत. एरिक यांनी सिंक्रोनाइझ केलेला व्हिडिओ आणि साधार सत्य असलेल्या महत्त्वाच्या लक्षणांसंबंधी डेटा गोळा करण्यासाठी मोबाइल परिमाणे टीमचा पहिला प्लॅटफॉर्म डेव्हलप केला आणि Google Fit अ‍ॅपची वैशिष्ट्ये म्हणून स्मार्टफोन कॅमेराद्वारे हार्ट रेट आणि श्वसनाचा रेट मोजण्यासाठी टीमच्या तंत्रज्ञानांमागील पायलट अभ्यास केला. ही तंत्रज्ञाने डेव्हलप करताना वैविध्य विचारात घेतले जाईल याची खात्री करण्यातील त्यांच्या अनुभवामुळे त्यांनी संपूर्ण Google Health मध्ये समन्यायाची खात्री करण्यासाठी प्रक्रिया डेव्हलप करण्यामध्ये भूमिका बजावली. Google मध्ये येण्यापूर्वी, एरिक यांनी स्टॅनफोर्ड येथून बायोइंजिनियरिंगमध्ये MD आणि MS पूर्ण केले, जेथे त्यांनी टिश्यू इंजिनियरिंग अ‍ॅप्लिकेशनच्या वृद्धिघटक डिलिव्हरीसाठी नावीन्यपूर्ण पद्धती सुरू करण्याकरिता मायक्रोफ्लुइडिक्स वापरले आणि स्वतंत्र पेशी कॅप्चर करण्यासाठी व त्यांचे निरीक्षण करण्यासाठी टूल तयार केली. त्यासोबतच त्यांनी स्टॅनफोर्ड येथून केमिकल इंजिनियरिंगमध्ये BS मिळवली आहे.

डॉ. सनी जेनसेन यांचा फोटो

डॉ. सनी जेनसेन

तांत्रिक प्रोग्राम व्यवस्थापक

तांत्रिक प्रोग्राम व्यवस्थापक म्हणून डॉ. जेनसेन करत असलेले काम हे कर्करोगशास्त्र, मेडिकल इमेजिंग आणि मशीन लर्निंग व Google च्या पायाभूत संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष जगातील रुग्णांवर होणार्‍या परिणामांमध्ये करणे यांवर लक्ष केंद्रित करते. Google मध्ये सामील होण्यापूर्वी, त्या Verily Life Sciences येथे रोगांची वैविध्यपूर्ण लक्षणे व्यापणार्‍या मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचे नियामक धोरण आणि चिकित्सालयीन डेव्हलपमेंट याच्या प्रमुख होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) येथे स्तनांच्या कर्करोगाचे डिटेक्शन आणि निदान यांसंबंधी तंत्रज्ञानांच्या प्रमुख परीक्षण वैज्ञानिक म्हणून काम केले व नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूट येथे स्तनांच्या कर्करोगासंबंधी जनुकशास्त्रामध्ये संशोधन केले. डॉ. जेनसेन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथून मेडिकल फिजिक्समध्ये PhD मिळवली आहे.

डॉ. ख्रिस केली यांचा फोटो

डॉ. ख्रिस केली

चिकित्सक वैज्ञानिक

डॉ. ख्रिस्टोफर केली हे Google Health च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इमेजिंग आणि निदान टीममध्ये काम करणारे चिकित्सक वैज्ञानिक आहेत. ते Google च्या नावीन्यपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधनाचे प्रत्यक्ष चिकित्सालयीन प्रभावामध्ये सुरक्षितपणे रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करतात. Google मध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी किंग्ज कॉलेज लंडन येथे मेडिकल इमेजिंगमध्ये PhD पूर्ण केली. चिकित्सक म्हणून, त्यांनी NeoMate या नावाचे एक पुरस्कार विजेते स्मार्टफोन अ‍ॅप तयार केले, जे आजारी नवजात शिशूंची शुश्रूषा करणार्‍या डॉक्टर आणि परिचारिकांना सपोर्ट करण्यासाठी जगभर वापरले जाते. ते सेंट थॉमस हॉस्पिटल, लंडन येथील नवजात इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये बालरोगचिकित्सक म्हणून काम करत आहेत. वैद्यकासोबतच, ख्रिस यांनी यापूर्वी दोन इंटरनेट कंपन्यांची स्थापना करून त्यांची विक्री केली आहे आणि ते तंत्रज्ञानविषयक स्टार्टअपमधील एक श्रीमंत गुंतवणूकदार आहेत.

Google Health मधील करिअर

Google Health टीम तंत्रज्ञानातील तज्ञांना चिकित्सालयीन ​​​​सर्वोत्तम पद्धती आणि रुग्णाला प्राथमिकता देणे या तत्त्वांना जोडून एकत्रपणे काम करते — आरोग्य सेवेबद्दल स्वारस्य असलेल्या व आवड असलेल्या सर्वांना एक उत्तम संधी देते. आमच्या टीमध्ये सामील व्हायचे आहे का?