अब्जावधी लोकांना निरोगी राहण्यात मदत करणे

Google Health हे आरोग्यासंबंधित माहिती पुरवणे आणि याला अधिक चांगले बनवणारी उत्पादने व सेवांद्वारे सर्वांना निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही लोकांना निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी महत्त्वाची माहिती देणारी उत्पादने तयार करतो. आम्ही आरोग्य सेवेशी संबंधित टीमना आणखी कनेक्ट केलेली सेवा डिलिव्हर करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित निराकरणे डेव्हलप करत आहोत. तसेच आम्ही कर्करोगाचे निदान करण्यासाठी, अंधत्व रोखण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराची शक्यता पडताळून पाहत आहोत.

सर्वांना उपयुक्त आरोग्य संसाधन मिळायला हवेत .

आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आवश्यक प्रगतीला सपोर्ट करण्यासाठी आम्ही सर्वांना चांगले आरोग्यविषयक निर्णय घेण्यात मदत व्हावी याकरिता टूल आणि संसाधने तयार करत आहोत.

ग्राहकांसाठी

ग्राहकांसाठी

सेवादात्यांसाठी

सेवादात्यांसाठी

समुदायांसाठी

निरोगी समुदायांसाठी

संशोधकांसाठी

संशोधकांसाठी

महिला+ यांसाठी उपयुक्त असलेली सेवा

Google Health येथे, संशोधन, उत्पादन डेव्हलपमेंट आणि भागीदारीमार्फत महिला+ यांना मिळत असलेल्या शारीरिक व मानसिक आरोग्यामध्ये तसेच रुग्णसेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.

महिलांसाठी उपयुक्त असलेली सेवा

उत्तम आरोग्य एकट्याने मिळवता येत नाही

उदयोन्मुख तंत्रज्ञान नित्याच्या व्यवहारात आणण्याच्या सामूहिक ध्येयासाठी भागीदार म्हणून जागतिक दर्जाच्या चिकित्सालयीन, सार्वजनिक आरोग्य आणि शैक्षणिक संस्थांसोबत काम आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या भागीदारांचे ज्ञान आणि अनुभव, Google चे तंत्रज्ञानविषयक कौशल्य व रुग्णांच्या इनसाइट एकत्रित करून, आम्ही संशोधन करू शकतो व व्यक्ती, सेवादाते आणि आरोग्य व्यावसायिकांसाठी प्रगत आरोग्य सेवा निराकरणांच्या दिशेने काम करू शकतो.

Google चे आरोग्याच्या क्षेत्रातील सर्वात अलीकडचे काम पहा

The Keyword या Google च्या अधिकृत ब्लॉगवर आमच्या अलीकडील लाँच आणि घोषणांबद्दल अधिक जाणून घ्या.

गोपनीयता महत्त्वाची आहे

तुम्ही Google ची उत्पादने आणि सेवा वापरता, तेव्हा तुमच्या डेटाबाबत आमच्यावर विश्वास ठेवता. तुमचा डेटा खाजगी आणि सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी असते. तसेच Google Health येथे, आम्ही नवीन उत्पादने आणि सेवा तयार करत असताना आम्हाला गोपनीयता व सुरक्षेची पायाभूत तत्त्वे मार्गदर्शन करतात.

*वैशिष्ट्ये तुमच्या परवानग्या आणि सेटिंग्जच्या अधीन आहेत. ती काम करण्यासाठी गती, आवाज आणि इतर डिव्हाइस व सेन्सर डेटा वापरतात व त्यांना डिव्हाइस बेडच्या जवळ ठेवण्याची आणि ते तुमच्या झोपण्याच्या स्थितीसाठी कॅलिब्रेट करण्याची आवश्यकता असते. पूर्ण कार्यक्षमतेसाठी, Google Assistant, Google Fit अ‍ॅप आणि इतर Google अ‍ॅप्सची आवश्यकता असू शकते. डिव्हाइसचे स्थान नियोजन आणि जवळपासचे लोक, पाळीव प्राणी किंवा गोंगाट यांमुळे चुकीची रीडिंग मिळू शकतात. g.co/sleepsensing/preview येथे अधिक जाणून घ्या.