आरोग्य सेवेसंबंधी डेटाचे एकीकरण करण्यासाठी चिकित्सालयीन सॉफ्टवेअर
चिकित्सकांना त्यांच्या पेशंटची सेवा करण्यासाठी अधिक वेळ देण्यात Care StudioTM कसे मदत करते ते पहा.
चिकित्सकांना रुग्णांची माहिती एकत्रितपणे दाखवणे
JAMA नेटवर्क ओपन स्टडी यानुसार चिकित्सकांना आवश्यक असलेली माहिती कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे जास्त कामामुळे अनेक डॉक्टरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. चिकित्सकांचा वर्कफ्लो सुव्यवस्थित व्हावा आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळावा यासाठीच Care Studio तयार केले गेले आहे.
वैद्यकासाठी Search चे सामर्थ्य
माहितीला कसे व्यवस्थित लावावे हे Google ला नीट कळते आणि त्यांचा याच कौशल्याचा फायदा घेत Care Studio चिकित्सकांना माहिती अधिक लवकर मिळवून देते. या टूलमध्ये Clinical Search वैशिष्ट्य आहे ज्याच्या मदतीने चिकित्सकांना जे पाहिजे आहे ते फक्त टाइप करावे लागते आणि ती विविक्षित माहिती त्यांना लगेच मिळते, त्याच सोबत त्यासंबंधी इतर संकल्पनासुद्धा त्यांच्यापुढे ठेवल्या जातात.
महत्वाची माहिती प्रथम
आमचे टूल चिकित्सकांना केंद्रीकृत आणि एकच व्ह्यू देतात ज्यांत रुग्णाची सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात आधी दिलेली असते--रुग्णालयाला दिलेल्या भेटी, बाह्यरुग्ण म्हणजे आउटपेशंट भेटी, प्रयोगशाळेतील चाचण्या, औषधे आणि उपचार व प्रगतीसंबंधी टिपा. यांचा इंटरफेस वापरण्यास फार सोपा असल्यामुळे आरोग्यसंबंधी डेटा आणि ट्रेंड तक्ते, ग्राफ आणि इतर उपयुक्त फॉरमॅटमध्ये सहज दाखवले जाऊ शकतात.
गोपनीयता हे पायाभूत तत्व आहे
Care Studio अशा प्रकारे निर्माण केले गेले आहे की डेटाचा वापर आणि प्रोेसिंग कशा प्रकारे केले जाऊ शकते यासंबंधी नियमन आणि सर्वोत्कृष्ट पद्धतींचे पालन यात केले जाते, या नियमनांमध्ये HIPAA चा समावेश आहेच. रुग्णांचा डेटा Google च्या मालकीचा नसतो आणि आम्ही हा डेटा कधीच विकत नाही. माहितीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रशासकीय, तांत्रिक आणि भौतिक संरक्षण योजनांची अंमलबजावणी करतो.
Care Studio गोपनीयतेची वचनबद्धता
नियंत्रण
आमचे आरोग्य सेवा ग्राहक जी माहिती आम्हाला पुरवतात, त्यावर त्यांचेच नियंत्रण असते.
उद्देश
आमच्या आरोग्य सेवा ग्राहकांसोबतच्या आमच्या करारनाम्या(म्यां)नुसार आम्ही फक्त उत्पादने आणि सेवा पुरवण्याच्या उद्देशाने आरोग्यासंबंधित माहिती वापरतो
किमान माहिती
उत्पादने आणि सेवा सुरक्षितपणे पुरवण्यासाठी आरोग्यासंबंधित माहिती अॅक्सेस करणे गरजेचे असल्यास, आम्ही HIPAA व GDPR यांसारख्या गोपनीयता नियमनांप्रमाणे किमान माहिती गोळा करण्याच्या पद्धती वापरतो.
पारदर्शकता
आमचे आरोग्य सेवा ग्राहक निश्चिंत राहावेत, यासाठी त्यांच्या रुग्णांच्या आरोग्यासंबंधित माहितीचा आम्हाला असलेला अॅक्सेस यासंबंधित रिपोर्ट तयार करून आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो
नेमका वापर
आमच्या आरोग्य सेवा ग्राहकांच्या रुग्णांची आरोग्यासंबंधित माहिती आम्ही विकत नाही किंवा जाहिरातींसाठी आणि मार्केटिंगसाठी ती माहिती वापरत नाही
सुरक्षा
आमच्या सिस्टिम आणि टूलमध्ये आम्ही उद्योगजगतातील आघाडीची मजबूत गोपनीयता व सुरक्षा नियंत्रणे वापरतो
हमी
आमचे टूल अशा प्रकारे निर्माण केले गेले आहेत की त्यांत HIPAA आणि GDPR सारख्या गोपनीयतेशी आणि सुरक्षेशी संबंधित नियमनांचे संपूर्णपणे पालन व्हावे आणि आम्ही प्रतिष्ठित स्वतंत्र तृतीय पक्षांने केलेल्या ऑडिटमध्ये सुद्धा सहभागी होतो.
आरोग्य सेवेच्या डेटाची शक्ती ओळखणे
आज मेडिकल डेटा खूप निरनिराळ्या ठिकाणी असतो, आरोग्यसंबंधी रेकॉर्ड अनेक प्रकारच्या सिस्टिममध्ये आहेत. Care Studio जटिल माहितीला सोपे करून दाखवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यसंबंधी डेटाला रीअल-टाइममध्ये आणि सामान्य अनुलंब पद्धतीने दाखवते.