Google Health Studies सोबत संशोधनामध्ये सहभागी व्हा

तुमच्या फोनवरून आणि सुरक्षितपणे आघाडीच्या संस्थांसोबत आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या संशोधनामध्ये भाग घेण्यास तुम्हाला सक्षम करणारे Google चे नवीन अ‍ॅप.

Google च्या मदतीने, वैज्ञानिकांच्या नेतृत्वातील आरोग्य संशोधन

डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य संशोधकांसोबत भागीदारी करून, Google Health हे आरोग्याविषयीची आमची समज सुधारण्यात मदत करू शकणारे सुरक्षित तंत्रज्ञान पुरवत आहे. आमच्या भागीदारींना नेहमी स्वास्थ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार्यां आरोग्य सेवा तज्ञांचे मार्गदर्शन मिळत राहील.

हाती कोड्याचे तुकडे धरलेल्या लोकांचे इलस्ट्रेशन

तुमच्या समुदायाच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे

व्यक्तींप्रमाणेच स्वतंत्र समुदायांनादेखील आरोग्य सेवेसंबंधी विशिष्ट आवश्यकता असतात. Google Health Studies संशोधनामध्ये सहभागी होऊन, तुमच्या समुदायाच्या आरोग्यासंबंधी विशिष्ट समस्या आणि आवश्यकतांचे आणखी चांगले आकलन विकसित करण्यात आघाडीच्या संस्था व संशोधकांना तुम्ही मदत करू शकता. अभ्यासामधील तुमच्या सहभागामुळे तुमच्या प्रदेशातील आरोग्यावर आणि सर्वांसाठी आरोग्यसेवेच्या भविष्यावरदेखील परिणाम होऊ शकतो.

डिजिटल संतुलनासंबंधित अभ्यास

श्वसनासंबंधित आरोग्य अभ्यास

डिजिटल संतुलनासंबंधित अभ्यास

डिजिटल संतुलनाच्या आकलनामध्ये योगदान द्या

उपलब्ध असलेला दुसरा अभ्यास म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगॉन येथील सेंटर फॉर डिजिटल मेंटल हेल्थने आयोजित केलेला डिजिटल संतुलनासंबंधी अभ्यास. तुम्ही या अभ्यासात सहभागी झाल्यास, स्मार्टफोनच्या वापराचे पॅटर्न मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यांशी कसे संबंधित आहेत हे समजून घेण्यात संशोधकांना मदत करण्यासाठी डेटा पुरवाल.

डॉ. निक अ‍ॅलन यांचा फोटो

डॉ. निकोलस अ‍ॅलन, युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगॉन येथील चिकित्सालयीन मानसशास्त्राचे अ‍ॅन स्विंडेल्स प्राध्यापक आणि सेंटर फॉर डिजिटल मेंटल हेल्थचे संचालक.

डिजिटल तंत्रज्ञाने आधुनिक जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये परिवर्तन करत आहेत, पण ती मानवी स्वास्थ्यासोबत कसा सुसंवाद साधतात याबद्दल आपण अधिक जाणून घेण्याची गरज आहे. हा नावीन्यपूर्ण अभ्यास या प्रश्नावर नवीन प्रकाश टाकू शकतो.

युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगॉन

श्वसनासंबंधित आरोग्य अभ्यास

श्वसनाचे आजार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात संशोधकांना मदत करा

श्वसनाशी संबंधित आरोग्याबाबतचा अभ्यास हा बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलने केलेला पहिला उपलब्ध असलेला अभ्यास आहे. तुम्ही या अभ्यासात सहभागी झाल्यास, लोकसंख्याशास्त्र, आरोग्याचा इतिहास, वर्तन आणि मोबिलिटी पॅटर्न श्वसनाच्या आजारांच्या प्रसारासाठी कसे योगदान देतात हे समजून घेण्यात संशोधकांना मदत करण्यासाठी डेटा पुरवाल.

डॉ. जॉन ब्राउनस्टाइन यांचा फोटो

डॉ. जॉन ब्राउनस्टाइन, हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्राध्यापक आणि बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलचे मुख्य नवप्रवर्तन अधिकारी.

Google Health Studies हे संशोधकांना महामारीविषयक अभिनव इनसाइट शोधू देऊन, लोकांना वैद्यकीय संशोधनामध्ये सहभागी होण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग पुरवते.

बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटल

तुमची माहिती खाजगी ठेवून लोकांना मदत करा

श्वसनाशी संबंधित आरोग्याबाबतच्या अभ्यासामध्ये तुमच्या माहितीचे संरक्षण करा.

फोनकडे बघणाऱ्या माणसाचे इलस्ट्रेशन

तुमचा अभ्यास डेटा तुमच्या डिव्हाइसमध्येच राहतो

आरोग्याबाबतच्या अभ्यासामध्ये सामील झाल्यानंतर तुम्ही साप्ताहिक सर्वेक्षणे पूर्ण करण्यास सुरुवात कराल. तुमचे सर्वेक्षणातील वैयक्तिक प्रतिसाद, स्थान इतिहास आणि ओळखीशी जोडलेला इतर वैयक्तिक डेटा हा नेहमीच तुमच्या डिव्हाइसमध्येच राहतो.

सुरक्षा लॉक असलेल्या फोनचे इलस्ट्रेशन

तुमचे डिव्हाइस तुमच्या अभ्यास डेटावर आधारित आकडेवारीची गणना करते

अभ्यासादरम्यान, तुमच्या डिव्हाइसला तुमच्या वैयक्तिक अभ्यास डेटावर आधारित वेगवेगळ्या क्वेरी, गणना आणि सारांश मिळतात आणि त्यानंतरच्या एकत्रित विश्लेषणासाठी हे परिणाम एंक्रिप्ट केले जातात.

सुरक्षित डेटा दाखवणारे इलस्ट्रेशन

सहभागींचा डेटा एकत्रित केला जातो

फेडरेटेड अनॅलिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक डिव्हाइसवरील एंक्रिप्ट केलेला सारांश एकत्रित केला जातो. तुमच्याबद्दलचा कोणताही वैयक्तिक अभ्यास डेटा Google आणि अभ्यास भागीदारांना मिळत नाही.

आलेख आणि चार्टचे विश्लेषण करणाऱ्या शास्त्रज्ञांचे ग्राफिक

तुमच्या गोपनीयतेला महत्त्व देणारे संशोधन

एकत्रित केलेल्या इनसाइट या अभ्यास करणाऱ्या संशोधकांना सुरक्षितपणे पाठवल्या जातात. तुमची ओळख उघड करणारा वैयक्तिक अभ्यास डेटा कधीही Google किंवा तृतीय पक्षांना उपलब्ध होणार नाही; त्यामुळे तुम्ही आरोग्य संशोधनात सुरक्षितपणे योगदान देऊ शकता.

तुमच्या आरोग्यासंबंधित माहितीचे संरक्षण करणे

वैयक्तिक आरोग्य माहिती अत्यंत संवेदनशील असते, म्हणूनच Google Health Studies तुमचा डेटा खाजगी आणि संरक्षित ठेवण्यासाठी गोपनीयता जतन पद्धती वापरते. तुम्ही Google Health Studies सह संशोधनात सहभागी होण्याचे निवडल्यास, Google तुमचा अभ्यास डेटा विकत नाही आणि तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी त्याचा वापर करत नाही. ज्या उद्देशांसाठी तो वापरला जाईल त्याकरिता तुम्ही स्पष्टपणे संमती दिली पाहिजे. तुम्ही अभ्यासातून कधीही सहजपणे नोंदणी रद्द करू शकता. तसेच तुम्ही ॲप हटवणे निवडल्यास, तुमच्या फोनवरून सर्व अभ्यास डेटा हटवला जाईल आणि कोणतीही नवीन माहिती गोळा केली जाणार नाही.

प्रातिनिधिक आरोग्य संशोधनाच्या दिशेने एक पाऊल

Google Health Studies हे आघाडीच्या संशोधन संस्थांना तांत्रिक पायाभूत सुविधा देऊन अभ्यासातील सहभागींशी संपर्क साधणे जलद आणि सोपे बनवते. तुम्हाला तुमचा अभ्यास या प्लॅटफॉर्मवर जोडवायचा असल्यास, अधिक अभ्यासासाठी ॲप उपलब्ध झाल्यावर सूचना मिळवा.

यू.एस. ची १०% पेक्षा कमी लोकसंख्या चिकित्सालयीन चाचण्यांमध्ये सहभागी होते

दहापैकी एक व्यक्ती दाखवणारे ग्राफिक

वांशिक सहभाग भौगोलिक स्थानांनुसार वेगळा कसा असतो?

युनायटेड स्टेट्समध्ये असो किंवा उर्वरित जगामध्ये, चिकित्सालयीन चाचणीमधील बहुसंख्य सहभागी श्वेतवर्णीय असतात. चाचणीमधील बहुतांश आशियाई सहभागी हे यू.एस. मध्ये नसलेल्या स्थळांवर होते. यू.एस. मधील स्थळांवरील कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन अमेरिकन सहभागींचे प्रतिनिधित्व हे यू.एस. च्या सर्वसाधारण लोकसंख्येसारखेच आहे, जे १३% कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन अमेरिकन असे आहे (२०११ - २०१५ जनगणना)

वंश चार्ट कीचे ग्राफिक
जागतिक सहभागींची एकूण संख्या १३१,७४९ असल्याचे दाखवणारे ग्राफिक
उर्वरित जगातील सहभागींची एकूण संख्या ९०,९१४ असल्याचे दाखवणारे ग्राफिक
युनायटेड स्टेट्समधील सहभागींची एकूण संख्या ४०,८३५ असल्याचे दाखवणारे ग्राफिक
आरोग्यविषयक अभ्यासामध्ये सहभागी झालेला पुरुष आणि महिला

आजच Google आरोग्यविषयक अभ्यासामध्ये सहभागी व्हा

आघाडीच्या संशोधन संस्थांनी नेतृत्व केलेल्या आणि विकसित केलेल्या आरोग्य संशोधनामध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला एक मिनिट द्या.