Google आरोग्य समन्यायासाठी वचनबद्ध आहे

सर्व ठिकाणी, सर्वांना निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी Google Health वचनबद्ध आहे. आम्ही आरोग्य समन्यायाची संकल्पना पुढे नेण्यासाठी आणि आरोग्याच्या संरचनात्मक व सामाजिक निर्धारक तत्त्वांवर चांगला प्रभाव पाडण्यासाठी काम करत आहोत. जागतिक आरोग्य समन्याय समुदायाचा एक भाग असल्यामुळे आमची उत्पादने, सेवा आणि संशोधन यांच्यातून प्रत्येकाला त्यांची संपूर्ण आरोग्य क्षमता साध्य करण्यात मदत करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. अनेक क्षेत्रांमधील नवीन आणि दीर्घकाळ पदावर असलेल्या लीडर्ससोबत सहयोग करण्यासाठी आमच्या तांत्रिक क्षमता व संसाधनांचा वापर करून आरोग्य समन्यायाच्या क्षेत्रातील नवीन कल्पना पुढे नेणे हे आमचे ध्येयच आहे. लोक आणि समुदायांच्या आरोग्यासंबंधित परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपण एकत्र मिळून काम करू शकतो.

एकत्र उभा असलेला लोकांचा गट.

Google वर सर्व ठिकाणी आरोग्य समन्याय असे काम करते

आरोग्य समन्यायावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता ही एक संधी आहे. आरोग्य समन्यायाला चालना देण्यात Google कशा प्रकारे मदत करत आहे याची काही उदाहरणे येथे आहेत.

Google Search

Google Search

माहिती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि जिथे अपुरी माहिती आहे तेथे संपूर्ण माहिती पुरवल्याने आणखी निष्पक्ष आरोग्य सेवा पुरवणे शक्य होऊ शकेल. Google Search वर आम्ही अमेरिकेतील लोकांसाठी पात्रता निकष आणि नोंदणीची प्रक्रिया यांच्यासकट Medicaid व Medicare बद्दलची माहिती शोधणे सोपे केले आहे.

अधिक जाणून घ्या
YouTube

YouTube

आम्ही आरोग्यसंबंधी अधिकृत माहितीचा आणि आरोग्यसंबंधी काँटेंट तयार करणाऱ्या क्रियेटर्ससाठीचा ॲक्सेस वाढवीत आहोत ज्यामुळे लोकांना आणि समुदायांना यासाठी फार लांब जावे लागणार नाही. आम्ही KFF (कायसर फॅमिली फाउंडेशन) यांच्यासोबत भागीदारी करून एक नवीन प्रोग्रॅम THE-IQ सुरू केला आहे. या प्रोग्रॅममध्ये तीन अशा संस्था आहेत ज्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या आणि/ किंवा कमी संसाधने असलेल्या समुदायांसोबत काम करून मानसिक आरोग्य, प्रसूतिसंबंधी आरोग्य आणि आरोग्य सेवा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांची मते आणि त्यांचा दृष्टिकोन YouTube वरील ऑडियंसपर्यंत पोहोचवतात.

आता पहा
AI चा वापर

AI चा वापर

औषधे, आरोग्य सेवा आणि संशोधन क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटॅलिजन्स (AI) मॉडेलचा वापर वाढवण्यासाठी आम्ही भागीदारांसोबत सहयोग करत आहोत. विविध संदर्भांमध्ये सेवा अधिक ॲक्सेसिबल बनवण्यासाठी अल्ट्रासाउंड आणि तपासण्या करण्यात पुरवठादारांना मदत करण्यासाठी आम्ही Northwestern Medicine सोबत AI चा वापर योग्य आहे किंवा नाही हे दाखवणाऱ्या मूलभूत, मुक्त ॲक्सेस असलेल्या संशोधन अभ्यासांवर काम करत आहोत.

अधिक जाणून घ्या
Google Cloud चे मेडिकल इमेजिंग सुईट

Google Cloud चे मेडिकल इमेजिंग सुईट

इमेजिंगसंबंधित डेटा आणखी ॲक्सेसिबल, इंटरऑपरेबल आणि उपयुक्त करून मेडिकल इमेजिंगसाठी AI च्या विकासाला चालना देण्यात आम्ही संस्थांना मदत करत आहोत. गंभीर आजारांना प्राधान्य देऊन, उपचारांसंबंधित निर्णयांत मदत करून आणि सेवांचा अभाव असलेल्या प्रदेशांमध्ये स्क्रीनिंगची सोय उपलब्ध करून रोगांचा तपास आणि निदानामध्ये सुधारणा करण्यासाठी संस्थांना सक्षम करत आहोत.

अधिक जाणून घ्या
Fitbit

Fitbit

आम्ही आरोग्यासंबंधित असमानतेबाबत संशोधन करण्यासाठी वेअरेबल तंत्रज्ञान आणत आहोत. Scripps Research येथील बालरोगतज्ञ आणि उपशामक सेवा चिकित्सक तोलुवालाशे अजायी, एमडी यांसारख्या भागीदारांसोबत आम्ही काम करत आहोत. डॉ. अजायी यांच्या PowerMom FIRST या मोबाइल संशोधन प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे या प्रश्नांची उत्तरे देणे की Fitbit Luxe ट्रॅकर आणि Aria Air स्मार्ट स्केल वापरून केलेल्या अभ्यासाद्वारे संरचनात्मक वंशवाद व भेदभाव यांचा गर्भवती महिला आणि तिच्या गर्भाच्या आरोग्यावर कसा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
अभ्यासामध्ये सामील व्हा.

अधिक जाणून घ्या
Fitbit साठी Google Cloud डिव्हाइस कनेक्ट

Fitbit साठी Google Cloud डिव्हाइस कनेक्ट

आरोग्यासंबंधित असमानतेची दखल घेणे हे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. Fitbit Health Solutions आणि Google Cloud यांनी असा नवीन उपाय शोधला आहे, ज्यामध्ये आरोग्य कंपनींना डेटामधून फार लवकर इनसाइट मिळवता येतात व चिकित्सालयीन सेवेसंबंधित साधनांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या रुग्णांच्या आरोग्याचे सकल दृश्य समजून घेता येते. Fitbit संबंधित डेटासोबतच लोकसंख्याशास्त्र आणि आरोग्याबद्दलचे सामाजिक घटक (SDOH) यांसारख्या विविध डेटासेटचे विश्लेषण केल्याने संस्थांना व संशोधकांना जगभरातील लोकांमध्ये असलेल्या असमानतांबद्दल नवीन गोष्टी समजतात.

अधिक जाणून घ्या
Google Fit

Google Fit

या अ‍ॅपमुळे तुम्ही तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वसनाचा दर फक्त तुमच्या फोनचा कॅमेरा वापरून मोजू शकता. तुमच्या आरोग्याची तपासणी करताना ही दोन महत्त्वाची लक्षणे साधारणपणे वापरली जातात. शक्य तितक्या जास्त लोकांसाठी ती उपयोगी ठरावी यासाठी आम्ही ही दोन्ही वैशिष्ट्ये तयार केली आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या बोटाच्या टोकामधील रंगाच्या बदलांवरून लावलेल्या रक्त प्रवाहाच्या अंदाजावर आमचा हार्ट रेटसंबंधित अल्गोरिदम आधारित असतो, त्यामुळे तो अल्गोरिदम सर्वांसाठी उपयुक्त ठरेल यासाठी प्रकाश, त्वचेचा रंग, वय आणि असे बरेच घटक विचारात घ्यावे लागतात.

अधिक जाणून घ्या

Google चा आरोग्य समन्याय संशोधन उपक्रम

आरोग्य समन्यायाला चालना देण्यासाठी आणि आरोग्य सेवांमधील असमानता कमी करण्यासाठी Google Health, Google Cloud Platform, Fitbit आणि Fitabase हे एकत्र काम करत आहेत. अमेरिकेतील शैक्षणिक संस्था आणि ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संशोधन संस्था यांच्यातील संशोधकांना Google Health समन्याय संशोधन उपक्रम, म्हणजेच Google Health Equity Research Initiative यामध्ये त्यांचे आरोग्य समन्याय संशोधन प्रस्ताव सबमिट करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. हा उपक्रम म्हणजे संशोधकांसाठी निधी, Google and Fitbit चे वियरेबल डिव्हाइस, Fitabase च्या सेवा आणि/ किंवा Google Cloud Platform क्रेडिट असे पुरस्कार मिळवण्याची संधी होती. आरोग्यासंबंधित असमानता आणि/ किंवा नकारात्मक सामाजिक व आरोग्याच्या संरचनात्मक निर्धारकांमुळे विपरीत परिणाम झालेल्या गटांसाठी आरोग्य समन्याय संशोधनाला पुढे नेणे आणि आरोग्यासंबंधित परिणामांमध्ये सुधारणा करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. साल 2023 च्या विजेत्यांची माहिती इथे पहा.

Watch the 2022 Health Equity Summit

प्रगती शेअर करण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी व आरोग्य समन्याय वाढवण्याकरिता आणि व्यवस्थेची प्रगती साधण्याकरिता भागीदारी प्रमोट करण्यासाठी आम्ही आरोग्य सेवा, वैद्यकीय तंत्रज्ञान, सरकार व शिक्षण क्षेत्रांमधील आघाडीवर असलेल्या व्यक्तींना एकत्र आणले आहे. सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक धोरण, सामाजिक विज्ञान, जीववैद्यकीय माहितीशास्त्र, काँप्युटर सायन्स, वाहतूक, गृहनिर्माण आणि समुदाय व आर्थिक विकास या क्षेत्रांकडून आम्हाला निष्पक्ष आणि सर्वसमावेशक ग्राहक उत्पादने व आरोग्याला आधारदायी असलेली तंत्रज्ञाने कशी तयार करावीत याबद्दल बरेच शिकायचे आहे.