Google आरोग्य समन्यायासाठी वचनबद्ध आहे
सर्व ठिकाणी, सर्वांना निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी Google Health वचनबद्ध आहे. आम्ही आरोग्य समन्यायाची संकल्पना पुढे नेण्यासाठी आणि आरोग्याच्या संरचनात्मक व सामाजिक निर्धारक तत्त्वांवर चांगला प्रभाव पाडण्यासाठी काम करत आहोत. जागतिक आरोग्य समन्याय समुदायाचा एक भाग असल्यामुळे आमची उत्पादने, सेवा आणि संशोधन यांच्यातून प्रत्येकाला त्यांची संपूर्ण आरोग्य क्षमता साध्य करण्यात मदत करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. अनेक क्षेत्रांमधील नवीन आणि दीर्घकाळ पदावर असलेल्या लीडर्ससोबत सहयोग करण्यासाठी आमच्या तांत्रिक क्षमता व संसाधनांचा वापर करून आरोग्य समन्यायाच्या क्षेत्रातील नवीन कल्पना पुढे नेणे हे आमचे ध्येयच आहे. लोक आणि समुदायांच्या आरोग्यासंबंधित परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपण एकत्र मिळून काम करू शकतो.
Google वर सर्व ठिकाणी आरोग्य समन्याय असे काम करते
आरोग्य समन्यायावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता ही एक संधी आहे. आरोग्य समन्यायाला चालना देण्यात Google कशा प्रकारे मदत करत आहे याची काही उदाहरणे येथे आहेत.
Google Search
माहिती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि जिथे अपुरी माहिती आहे तेथे संपूर्ण माहिती पुरवल्याने आणखी निष्पक्ष आरोग्य सेवा पुरवणे शक्य होऊ शकेल. Google Search वर आम्ही अमेरिकेतील लोकांसाठी पात्रता निकष आणि नोंदणीची प्रक्रिया यांच्यासकट Medicaid व Medicare बद्दलची माहिती शोधणे सोपे केले आहे.
अधिक जाणून घ्याYouTube
आम्ही आरोग्यसंबंधी अधिकृत माहितीचा आणि आरोग्यसंबंधी काँटेंट तयार करणाऱ्या क्रियेटर्ससाठीचा ॲक्सेस वाढवीत आहोत ज्यामुळे लोकांना आणि समुदायांना यासाठी फार लांब जावे लागणार नाही. आम्ही KFF (कायसर फॅमिली फाउंडेशन) यांच्यासोबत भागीदारी करून एक नवीन प्रोग्रॅम THE-IQ सुरू केला आहे. या प्रोग्रॅममध्ये तीन अशा संस्था आहेत ज्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या आणि/ किंवा कमी संसाधने असलेल्या समुदायांसोबत काम करून मानसिक आरोग्य, प्रसूतिसंबंधी आरोग्य आणि आरोग्य सेवा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांची मते आणि त्यांचा दृष्टिकोन YouTube वरील ऑडियंसपर्यंत पोहोचवतात.
आता पहाAI चा वापर
औषधे, आरोग्य सेवा आणि संशोधन क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटॅलिजन्स (AI) मॉडेलचा वापर वाढवण्यासाठी आम्ही भागीदारांसोबत सहयोग करत आहोत. विविध संदर्भांमध्ये सेवा अधिक ॲक्सेसिबल बनवण्यासाठी अल्ट्रासाउंड आणि तपासण्या करण्यात पुरवठादारांना मदत करण्यासाठी आम्ही Northwestern Medicine सोबत AI चा वापर योग्य आहे किंवा नाही हे दाखवणाऱ्या मूलभूत, मुक्त ॲक्सेस असलेल्या संशोधन अभ्यासांवर काम करत आहोत.
अधिक जाणून घ्या