संपूर्ण Google वर मानसिक आरोग्याशी सबंधित संसाधने

मानसिक आरोग्य हा संपूर्णपणे वैयक्तिक आणि बहुधा आव्हानात्मक प्रवास असतो व जगभरात अंदाजे १ अब्ज लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित विकार आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाही. तुमच्या मानसिक स्वास्थ्याच्या प्रवासामध्ये नेव्हिगेट करण्यात तुमची मदत करण्यासाठी माहिती, संसाधने आणि टूल देऊ करून, या मार्गातील प्रत्येक पायरीवर तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी Google वचनबद्ध आहे.

मानसिक आरोग्य पेजसाठी हिरो इमेज

माहिती आणि सपोर्ट यांसह तुम्हाला सक्षम करणे

Google च्या अनेक टीम्सने मानसिक आरोग्यासाठी टूल आणि वैशिष्ट्ये तयार केली आहेत. मानसिक ताण वाढवणाऱ्या घटनांनंतर तुम्हाला विश्रांती मिळण्यात मदत करणाऱ्या टूलपासून संकटामध्ये सपोर्ट मिळवून देण्याच्या वैशिष्ट्यांपर्यंत, अधिकाधिक लोकांच्या मानसिक आरोग्याचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी आम्ही नेहमीच नवनवीन मार्ग शोधत असतो.

Google Search

आपत्तीच्या काळामध्ये, अचूक माहितीचा अ‍ॅक्सेस महत्त्वाचा असतो. Google Search प्रत्येकाला अनेक उच्च गुणवत्तेची संसाधने उपलब्ध करून देऊ शकते.

आपत्ती हॉटलाइनची इमेज

आपत्कालीन हॉटलाइन

एखादी व्यक्ती आत्महत्या, कौटुंबिक हिंसा किंवा लैंगिक अत्याचार यांच्याशी संबंधित संज्ञा शोधत असल्यास, त्यांना डझनावारी देशांमध्ये आणि भाषांमध्ये, आपत्कालीन हॉटलाइन पुरवठादारांच्या प्रमुख लिंक दिसतील. यासाठी आम्ही ThroughLine आणि ९८८ Suicide and Crisis Lifeline यांसारख्या संस्थासह भागीदारी केली आहे.

स्व-तपासणीची इमेज

स्व-तपासणी

ठराविक देशांमध्ये नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्यासंबंधी इतर विकारांवर माहिती शोधत असलेले लोक लक्षणांच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी चिकित्सालयांनी प्रमाणित केलेल्या स्व-तपासण्या, तसेच इतर संसाधनांच्या लिंकसुद्धा अ‍ॅक्सेस करू शकतात. लोकांना नेहमी त्यांच्या आरोग्य सेवा पुरवठादारांकडून अतिरिक्त मार्गदर्शन मिळवण्यासाठी सांगितले जाते.


YouTube

YouTube व्हिडिओ शेअरिंग आणि शिक्षणाचा प्लॅटफॉर्म असल्यामुळे, यावर मानसिक आरोग्य आणि कल्याण यांना सपोर्ट करणाऱ्या वैशिष्ट्यांना खूप महत्त्व आहे. आरोग्यासंबंधी उच्च गुणवत्तेची माहिती सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देण्यासाठी YouTube Health टीम समर्पित आहे.

आरोग्यविषयक आशय शेल्फ GIF

आरोग्यविषयक आशय शेल्फ

तुम्ही YouTube वर विशिष्ट शारीरिक किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित विषय शोधल्यास, तुम्हाला तुमच्या शोध परिणामांमध्ये आरोग्यविषयक आशय असलेला शेल्फ आढळू शकेल. आरोग्यविषयक आशय शेल्फमध्ये असे व्हिडिओ असतील जे तुम्ही शोधलेल्या आरोग्य विषयाशी संबंधित आहेत आणि यामध्ये असा आशयसुद्धा असू शकेल जो तुम्ही शोध घेता आहात त्या भाषेमध्ये असेल, पण इतर देश/प्रदेशांतील असू शकेल. शेल्फसाठी कोणते चॅनल पात्र आहेत हे ठरवण्यासाठी आम्ही नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिन, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि कौन्सिल ऑफ मेडिकल स्पेशालिटी सोसायटीज यांनी नेमलेल्या तज्ञांनी तयार केलेली तत्त्वे वापरतो.

माहिती पॅनलची इमेज

माहिती पॅनल

जेव्हा तुम्ही YouTube वर मानसिक आरोग्यासंबंधी किंवा इतर आरोग्यासंबंधी व्हिडिओ पाहता, तेव्हा तुम्हाला व्हिडिओच्या खाली यामधील माहितीच्या स्रोताबद्दल संदर्भ पुरवणारी माहिती पॅनल दिसू शकेल. तुम्हाला YouTube वर आढळणाऱ्या आणि तुम्ही पाहत असलेल्या आरोग्यविषयक आशयाचे स्रोत आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आणखी माहिती देणे हा या पॅनलचा उद्देश आहे.

आपत्तीसंबंधी संसाधनांचे पॅनलची इमेज

आपत्तीसंबंधी संसाधनांचे पॅनल

आत्महत्या, स्वतःला हानी पोहोचवणे, खाण्याशी संबंधित विकार, लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसा यांसारख्या विशेष संवेदनक्षम विषयांवरील व्हिडिओ जर तुम्ही शोधले किंवा पाहिले, तर YouTube असे ठळक पॅनल दाखवू शकते ज्यांच्याद्वारे दर्शक आपत्कालीन सेवा भागीदारांकडील सपोर्ट मिळवू शकतात. तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास, आपत्तीसंबंधित संसाधनांचे पॅनल तुम्हाला भागीदारांच्या वेबसाइटशीदेखील लिंक करते.

आत्महत्या, स्वतःला हानी पोहोचवणे आणि खाण्याशी संबंधित विकार यांबाबतच्या धोरणाची इमेज

आत्महत्या, स्वतःला हानी पोहोचवणे आणि खाण्याशी संबंधित विकार यांबाबतचे धोरण

YouTube मध्ये आत्महत्या, स्वतःला हानी पोहोचवणे आणि खाण्याशी संबंधित विकारांसह, मानसिक आरोग्य विषयांबाबत विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणे आहेत. YouTube ची वयोमर्यादा आणि आशय काढून टाकण्यासंबंधी धोरणे यांबद्दल अधिक वाचा.

वैयक्तिक अनुभवांच्या शेल्फची इमेज

वैयक्तिक अनुभवांचे शेल्फ

वैयक्तिक अनुभवांच्या शेल्फवरून तुम्ही अशा निर्माणकर्त्यांच्या आशयावर जाऊ शकता जे काही विशिष्ट मानसिक आरोग्याच्या काही विशिष्ट विकारांबद्दल त्यांचे वैयक्तिक आणि खरे अनुभव शेअर करतात, ज्यामुळे समानुभूतिचे वातावरण निर्माण होते आणि त्याबद्दलची हीन भावना कमी होते.

स्क्रीन वेळ व्यवस्थापित करणे याची इमेज

स्क्रीन वेळ व्यवस्थापित करणे

तुमच्या YouTube वरील वेळेचे व्यवस्थापन करण्यात मदत करण्यासाठी YouTube वर वैशिष्ट्यांचा स्वीट आहे, ज्यामध्ये बेडटाइम आणि ब्रेक रिमाइंडर व किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी अतिरिक्त टिपा आणि संसाधने आहेत.

YouTube वर पर्यवेक्षित अनुभवची इमेज

YouTube वर पर्यवेक्षित अनुभव

आम्ही YouTube एक्सप्लोर करण्यासाठी लहान मुले, कुमारवयीन आणि किशोरवयीन मुलांसाठी वयानुसार योग्य मार्ग देतो. प्रत्येक कुटुंबाचा मीडिया आणि तंत्रज्ञानाशी असलेला संबंध वेगवेगळा असतो, त्यामुळे आम्ही तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम काय असेल हे तुम्ही ठरवावे यासाठी तुम्हाला पर्याय देऊ करतो.

किशोरवयीन मुलांसाठीच्या आशयाशी संबंधित शिफारशींसाठी संरक्षक योजना

YouTube च्या तरुण पिढी आणि कुटुंबांसाठी सल्लागार समिती सोबत काम करताना, आम्ही किशोरवयीन मुलांसाठीच्या आशयाशी संबंधित शिफारशींकरिता अशा अतिरिक्त संरक्षक योजनांकडे लक्ष दिले ज्या त्यांना त्यांच्या आवडीचे विषय एक्सप्लोर करू देतात. सल्लागार समितीसोबत काम करताना, आम्ही आशयाच्या अशा वर्गवाऱ्या शोधल्या ज्यांचा व्हिडिओ एकदा पाहिल्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही, पण वारंवार पाहिल्यास काही तरुण प्रेक्षकांना त्यामुळे समस्या येऊ शकते. या वर्गवाऱ्यांबद्दल इथे अधिक जाणून घ्या.


तणाव ट्रॅकिंगची इमेज

तणाव ट्रॅकिंग

काही Fitbit आणि Pixel वॉचवरील cEDA (इलेक्ट्रोडर्मल ॲक्टिव्हिटी) सेन्सर Fitbit चे बॉडी रिस्पॉन्स वैशिष्ट्य सक्षम करतो. हा सेन्सर तणावाच्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या सकारात्मक किंवा नकारात्मक लक्षणांकडे लक्ष ठेवतो आणि संभाव्य तणावाच्या प्रतिसादांकडे निर्देश करू शकतो व तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतो. त्यानंतर तुम्ही त्या क्षणी तुम्हाला कसे वाटते याबाबत विचार करू शकता आणि तुमचा तणाव कमी करण्यासाठी कृती करू शकता - जसे की मार्गदर्शित श्वसन किंवा जागरूकता सेशन.

जागरूकतेचे टूलची इमेज

जागरूकतेचे टूल

Fitbit अ‍ॅपमधील मार्गदर्शित श्वसनाचे व्यायाम, जागरूकतेसंबंधी आशय आणि मूड लॉग इन करणे यांमुळे तुम्हाला तणावाच्या पातळ्या रीअल टाइममध्ये व्यवस्थापित करता येतात.

झोपेसंबंधी इनसाइटची इमेज

झोपेसंबंधी इनसाइट

Fitbit ची प्रगत स्लीप ट्रॅकिंग वैशिष्ट्ये तुम्हाला तुमच्या झोपेच्या गुणवत्तेबद्दल सखोल इनसाइट देऊ शकतात आणि त्यामध्ये सुधारणा कशी करावी यासाठी शिफारशी पुरवू शकतात. झोपेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Fitbit अ‍ॅपमध्ये फिटनेस ट्रॅकिंगची इमेज

Fitbit अ‍ॅपमध्ये फिटनेस ट्रॅकिंग

प्रगत फिटनेस वैशिष्ट्ये तुम्हाला प्रेरणा शोधणे, तुमची ध्येये ट्रॅक करणे आणि त्या दिशेने प्रगती करणे यात व तुम्ही रिकव्हरीला कधी प्राधान्य दिले पाहिजे हे जाणून घेण्यात मदत करतात.


आमच्या समुदायांमधील संस्थांना सपोर्ट करणे

स्थानिक संस्थांशी सहकार्य करणे हे लोकांपर्यंत योग्य वेळी, ते ज्यांवर विश्वास ठेवू शकतात अशा लोकांद्वारे पोहोचण्यासाठी महत्त्वाचे आहे. परिणाम करण्यासाठी आम्ही ज्यांच्यासोबत काम केले आहे अशा या काही संस्था आहेत.

Child Mind Institute

Child Mind Institute लहान मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करणारी आघाडीची स्वतंत्र ना-नफा संस्था आहे आणि ते मानसिक आरोग्य व शिकण्याच्या विकारांशी लढा देणाऱ्या मुलांचे आणि कुटुंबांचे जीवन पार बदलून टाकण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. Google.org ने हाय स्कूलच्या दहा लख विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यावरील प्रशिक्षण आणि ससाधनांसाठी पैसे दिले आहेत आणि YouTube ने Child Mind Institute सोबत भागीदारी करून मानसिक आरोग्याच्या प्रमुख विषयांवर आशय निर्माण करण्यासाठी सपोर्ट दिला आहे. अलीकडेच YouTube आणि Anchor Media यांनी स्वत:साठी करुणा आणि ग्राउंडिंग व्यायाम या विषयांवर मिळून तयार केलेल्या व्हिडिओ मालिकेला Anthem Award मिळाला आहे.

अधिक जाणून घ्या
व्यसनाधीनता संपवण्यासाठी भागीदारी

Google.org ॲक्सिलरेटर: जनरेटिव्ह AI च्या पहिल्या गटाचा एक भाग म्हणून, प्रशिक्षण सिम्युलेटर आणि क्वालिटी अश्युरन्स टूल तयार करण्यासाठी AI चा वापर करून Partnership to End Addiction ही संस्था कुटुंबांकरिता व्यसनमुक्तीसंबंधी सपोर्ट सेवांची पोहोच आणि गुणवत्ता संवर्धित करण्यासाठी काम करत आहे.

आता पहा
ReflexAI

माजी सैनिकांपुढे येणारी मानसिक आरोग्यासंबंधी विशेष आव्हाने ओळखून, Google.org हे अनुदान आणि Google.org च्या Fellowship सह HomeTeam तयार करण्यासाठी ReflexAI ला सपोर्ट करत आहे. हे AI द्वारे सक्षम केलेले टूल एकमेकांना सपोर्ट करण्याचे कौशल्य माजी सैनिकांना देते आणि गरज असलेल्यांना व्यावसायिक मदत मिळवण्यासाठी प्रोत्साहन देते.

अधिक जाणून घ्या
इलिनॉय राज्य

Google Public Sector ने लहान मुलांसाठी मानसिक आरोग्यासंबंधी संसाधनांच्या अ‍ॅक्सेसमध्ये सुधारणा करण्यासाठी इलिनॉयमधील राज्यपालांच्या कार्यालयासोबत आणि वर्तनविषयक आरोग्यासंबंधी राज्य एजन्सीसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीतून एजन्सीचे कर्मचारी आणि सेवादाते यांच्यासाठी एक समान एंट्री पॉइंट म्हणून काम करणारे BEACON पोर्टल तयार करण्यात आले.

अधिक जाणून घ्या
जागतिक आरोग्य संघटना (WHO)

Google.org च्या Ad Grants प्रोग्रॅममधून निरनिराळ्या संस्था मानसिक आरोग्यासंबंधी उच्च गुणवत्तेची, अधिकृत संसाधने अधिकाधिक लोकांपुढे आणू शकत आहेत. तसेच, WHO जगभरातील समुदायांसाठी मानसिक आरोग्याच्या गाईड्स 25 पेक्षा अधिक भाषांमध्ये आणत आहे ज्या 14 दशलक्ष पेक्षा अधिक लोकांपर्यंत Google Search जाहिरातींद्वारे पोहोचत आहेत, ज्यामुळे अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या वेबसाइटला 1 दशलक्ष पेक्षा अधिक लोकांनी भेट दिली आहे.

अधिक जाणून घ्या
Trevor Project

Google.org ने जगातील सर्वात मोठी आत्महत्या प्रतिबंध आणि LGBTQ+ तरुणांसाठी मानसिक आरोग्य संस्था असलेल्या Trevor Project ला Google.org Fellowship द्वारे लक्षणीय निधी आणि तांत्रिक सपोर्ट पुरवला आहे.  ही भागीदारी आपत्कालीन सेवा स्केल करण्यासाठी, समुपदेशकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि जगभरातील संघर्ष करणाऱ्या लाखो तरुण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी AI चा लाभ घेते.

अधिक जाणून घ्या

तरुण लोकांसाठी मानसिक आरोग्याची संसाधने

तरुण लोकांसाठी मानसिक आरोग्याची संसाधने

आम्ही पालकांना त्यांची मुले पाहत असलेला आशय आणि ते ऑनलाइन घालवत असलेला वेळ यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली टूल देतो. Family Link ॲप हे लहान मुले ऑनलाइन शिकत असताना आणि एक्सप्लोर करत असताना त्यांना मार्गदर्शन करण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला मूलभूत डिजिटल नियम सेट करू देते. मुलांसाठी अनुकूल आशयाकरिता तुम्ही Google TV वर कोणत्याही वयाच्या मुलांची प्रोफाइल सेट करू शकता किंवा मुख्य YouTube अनुभवावर पर्यवेक्षित खाते तयार करू शकता, ज्यामध्ये पालकांसाठी निवडण्याकरिता तीन अनुकूल केलेली आशय सेटिंग्ज, डिजिटल संतुलन आणि गोपनीयता संरक्षणे, पालक नियंत्रणे व मर्यादित वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे.

Google.org ने तंत्रज्ञानासोबत निकोप संबंध निर्माण करण्यासाठी आघाडीच्या शिक्षणतज्ञांच्या प्रोजेक्टना सपोर्ट करण्याकरिता $१.५ कोटी देण्याचे वचनदेखील दिले आहे. आमच्या Be Internet Awesome अभ्यासक्रमावर आधारित मजेदार आणि गुंतवून ठेवणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीनी भरलेली विशेष आवृत्ती तयार करण्यासाठी आम्ही Highlights Magazine सोबत भागीदारी केली आहे. प्रश्नमंजुषा, कोडी आणि काही क्राफ्ट प्रोजेक्टद्वारेदेखील, मुले स्मार्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि जबाबदार ऑनलाइन एक्सप्लोरर कसे व्हावे हे शिकतील. शिक्षक आणि पालकांसाठी विनामूल्य, अनुकूल केलेली संसाधनेदेखील आहेत.

या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, तरुणांचे मानसिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या आघाडीच्या संस्थांसाठी नवीन निधी म्हणून आम्ही $१ कोटीची घोषणा केली आहे: The Rare Impact Fund, DonorsChoose, The JED Foundation, Child Mind Institute आणि The Steve Fund — ज्यामुळे तरुणांचे डिजिटल संतुलन आणि ऑनलाइन सुरक्षितता यांसाठी आमची एकूण वचनबद्धता $२.५ कोटी इतकी वाढली आहे.  या निधीसह, आम्ही उच्च माध्यमिक शाळेच्या दहा लाख विद्यार्थ्यांसाठी आणि दहा हजार शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य प्रशिक्षण व संसाधने यांच्या रोलआउटला सपोर्ट दिला आहे.

आम्ही Googlers आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मानसिक आरोग्याला सपोर्ट करतो याची इमेज

आम्ही Googlers आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मानसिक आरोग्याला सपोर्ट करतो

आमच्या मेडिकल योजनांमध्ये मानसिक आरोग्यविषयक सेवांना कव्हर केले जाते. आमचा कर्मचारी साहाय्य उपक्रम गरजेच्या वेळी समुपदेशन पुरवतो आणि व्यवस्थापकांना त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत संघर्ष करत असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक चांगला सपोर्ट देता यावा यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ करतो. अमेरिकेमध्ये, आमचा Google Health & Wellness Center प्रोग्रॅम ऑन-साइट परवानाधारक समुपदेशकांसाठी आणि चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांसाठी असलेल्या अ‍ॅक्सेसचा विस्तार करत आहे.