अधिक निरोगी भविष्यासाठी भागीदारी करणे

परिवर्तनकारी आरोग्य सेवा साधने आणि सेवांसाठी निराकरणांचे उपयोजन करण्याकरिता, Google Health हे जागतिक दर्जाच्या चिकित्सालयीन, सार्वजनिक आरोग्य व शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी करत आहे. आमच्या भागीदारांचे ज्ञान आणि अनुभव, Google चे तंत्रज्ञानविषयक कौशल्य व रुग्णांच्या इनसाइट एकत्रित करून, आम्ही महत्त्वाचे संशोधन करू शकतो आणि व्यक्ती, सेवादाते व आरोग्य व्यावसायिकांसाठी प्रगत आरोग्य सेवा निराकरणांच्या दिशेने काम करू शकतो. सर्व लोकांच्या जीवनांत सुधारणा करण्याचे Google Health चे ध्येय साकार करण्यासाठी, आमच्या सहयोगात्मक प्रयत्नांमधून उदयोन्मुख तंत्रज्ञाने नित्याच्या व्यवहारात आणणे हे आमचे लक्ष्य आहे.

नातीला पाठुंगळीला घेऊन फिरणारे आजोबा
अपोलो हॉस्पिटल्स चा लोगो

निदान सेवांची अचूकता आणि उपलब्धता सुधारण्यासाठी डीप लर्निंग मॉडेल चिकित्सालयीन वर्कफ्लोमध्ये कसे इंटिग्रेट केले जाऊ शकते हे समजून घेण्याकरिता एक्स-रे सारख्या उपलब्ध व परवडणाऱ्या निदान टूलच्या वापराचा अभ्यास करण्याकरिता आम्ही भारतातील अपोलो हॉस्पिटल्स सोबत काम करत आहोत.

अरविंद आय केअर सिस्टीम चा लोगो

अनावश्यक अंधत्व दूर करण्यात मदत करण्यासाठी, डायबेटिक रेटिनोपॅथी विकाराचे निदान करण्यावर लक्ष केंद्रित करून, रेटीनल इमेजिंगकरिता आमच्या मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षमतांचा विकास व उपयोजनाकरिता आम्ही भारतामधील अरविंद आय हॉस्पिटल सोबत सहयोग करत आहोत.

CIDRZ यााचा लोगो

Google द्वारे प्रायोजित AI सह ऑगमेंटेड टूल निदान आणि मूल्यमापनात कशी मदत करू शकतात व ती मॉडेल क्षयरोगासाठी मूल्यमापन केले जाणारे रुग्ण ओळखण्यात चिकित्सकांना कशा प्रकारे मदत करू शकतात हे समजून घेण्याकरिता आम्ही झांबियामधील सेंटर फॉर इंफेक्शियस डिसीज रिसर्च (CIDRZ) सोबत सहयोग करत आहोत.

cvs

आरोग्य AI चा सुरक्षित, नैतिक वापर, डेटा गोपनीयतेचे संरक्षण करण्यास प्राधान्य देणे, AI ची अंमलबजावणी जबाबदारीला धरून करणे आणि समन्याय केंद्रस्थानी असलेल्या AI सिस्टीम तयार करणे यांबाबत आम्ही CVS Health सोबत काम करत आहोत.

Digital Medicine

आम्ही Digital Medicine Society (DiMe) सोबत भागीदारी करून सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वैद्यकीय सराव वर्धित करण्याकरिता डिजिटल पद्धतींच्या अंगीकाराला चालना देत आहोत. झोपेसाठी आणि शारीरिक हालचालींसाठी महत्त्वाचे चिकित्सालयीन मेट्रिक्स प्रस्थापित करण्यासाठी आमचे संयुक्त प्रयत्न आहेत, यामुळे रुग्णांच्या परिणामांमध्ये सुधारणा करणारे उपचार तयार करण्याचे काम लवकर होते आहे.

HCA

आम्ही वर्कफ्लो सुव्यवस्थित करण्यासाठी आणि चिकित्सक व रुग्णांमधील संभाषणांचे अचूक वैद्यकीय टिपांमध्ये आपोआप रूपांतर करण्यासाठी HCA Healthcare सोबत काम करत आहोत. नंतर ही संभाषणे Google Cloud चे जनरेटिव्ह AI वापरून रुग्णालयाच्या आरोग्यविषयक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये (EHR) इंटिग्रेट करण्यापूर्वी डॉक्टर त्यांचे पुनरावलोकन करून त्यांना मंजुरी देतात.

Humana

खर्च कमी करण्यासाठी आणि ग्राहकांच्या अनुभवांमध्ये सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाशी संबंधित उपायांचा अंगीकार करून व डेटा, विश्लेषण आणि AI यांचा योग्य वापर करून आरोग्य सेवेमध्ये नाविन्याला चालना देण्यासाठी आम्ही Humana सोबत भागीदारी करत आहोत.

मेयो क्लिनिक चा लोगो

मेयो क्लिनिक येथील जागतिक दर्जाच्या चिकित्सालयीन तज्ञांना प्रगत क्लाउड काँप्युटिंग, डेटा विश्लेषण आणि Google च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबत जोडून, रुग्णांना सेवा देण्यासाठी व आम्ही जगभरात सेवा देत असलेल्या लोकांचे आरोग्य व स्वास्थ्य यांमध्ये सुधारणा करण्यासाठी, आरोग्य सेवा पुरवठादारांना शक्य तितक्या सर्वोत्तम टूलनी सुसज्ज करणार्‍या परिवर्तनात्मक निराकरणांसंबंधी संशोधन करणे आणि ती तयार करणे यांकरिता आम्ही काम करत आहोत.

नॉर्थवेस्टर्न मेडिसिन चा लोगो

उपचार लवकर सुरू करण्यात मदत होण्यासाठी फुफ्फुसांच्या आणि स्तनांच्या कर्करोगाचे लवकर डिटेक्शन करण्याकरिता स्क्रीनिंग प्रक्रियेची अचूकता ऑप्टिमाइझ करण्याकरिता व वाढवण्यासाठी, Google हे नॉर्थवेस्टर्न मेडिसिन यासोबत चिकित्सालयीन संशोधनामध्ये सहयोग करत आहे.

राजाविथी हॉस्पिटल चा लोगो

रोखता येणार्‍या अंधत्वाचे निर्मूलन करण्यात मदत करण्यासाठी, डायबेटिक रेटिनोपॅथी विकाराचे निदान करण्यावर लक्ष केंद्रित करून, डायबेटिक इमेजिंगकरिता आमच्या मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षमतांचा विकास व उपयोजन यांमध्ये आम्ही राजाविथी हॉस्पिटल (थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाशी संलग्न) सोबत सहयोग करत आहोत.

शंकर नेत्रालय चा लोगो

आम्ही भारतामधील शंकर नेत्रालयासोबत, डायबेटिक रेटिनोपॅथी विकाराच्या लवकर निदानासाठी रेटिनोपॅथी इमेजिंगमध्ये सुधारणा करण्याकरिता आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन, बरे होऊ शकणाऱ्या अंधत्वाचे निर्मूलन करण्याच्या त्यांच्या ध्येयामध्ये भागीदारी केली आहे.

stanford

आरोग्य सेवा पुरवठादार त्यांच्या रुग्णांवर उपचार पर्सनलाइझ करण्याकरिता डेटा कसा वापरतात ते बदलण्याकरिता आम्ही स्टॅनफोर्ड मेडिसिन यासोबत सहयोग करत आहोत. वैद्यकीय संशोधन आणि चिकित्सालयीन सेवा यांमधील स्टॅनफोर्ड मेडिसिन याचे कौशल्य व Google चे डेटा विज्ञान, मशीन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षमता एकत्रित करून, अधिक लोकांपर्यंत दर्जेदार आरोग्य पोचवणे हे आमचे ध्येय आहे.

Health

तैवानचे राष्ट्रीय आरोग्य विमा ॲडमिनिस्ट्रेशन (NHIA), Google Cloud आणि Google Health हे एकत्र येऊन Google Cloud च्या AI व डेटा विश्लेषण क्षमतांचा योग्य वापर करून तैवानमधील टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी जोखमीचा अंदाज घेणे आणि व्यवस्थापनाची कामे करत आहेत.

Ubie

Health Connect by Android मार्फत लोकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी Google आणि Ubie सहकार्य करत आहेत. Ubie हे आरोग्य सेवा व्यावसायिकांना Google ची AI द्वारे सक्षम केलेली चिकित्सालयीन टूल देत आहेत, जी वर्कफ्लो सुव्यवस्थित करण्यासाठी आणि आरोग्यासंबंधित अधिक चांगल्या परिणामांना सपोर्ट करण्यासाठी डिझाइन केली आहेत.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

Google Health आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) हे उच्च गुणवत्तेच्या, सार्वजनिक आरोग्यविषयक अधिकृत आशयाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या; सार्वजनिक आरोग्यविषयक सध्याच्या, नवीन किंवा भविष्यातील धोक्यांसाठी समुदायाला सज्ज करण्याच्या व आरोग्यासंबंधित कमी संसाधने उपलब्ध असलेल्या ठिकाणी डिजिटल परिवर्तनाला सपोर्ट करण्याच्या संधी एक्सप्लोर करत आहेत.