गोपनीयता महत्त्वाची आहे

तुम्ही Google ची उत्पादने आणि सेवा वापरता तेव्हा, तुमच्या डेटाबाबत आमच्यावर विश्वास ठेवता. तुमचा डेटा खाजगी आणि सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी असते. तसेच Google Health येथे, आम्ही नवीन उत्पादने आणि सेवा तयार करत असताना आम्हाला गोपनीयता व सुरक्षेची पायाभूत तत्त्वे मार्गदर्शन करतात.

Google सह सुरक्षित हे दाखवणारे निळे शील्ड

तुमची गोपनीयता जबाबदार डेटाविषयक कार्यपद्धतींद्वारे संरक्षित आहे

तुम्ही दररोज वापरत असलेली उत्पादने आणि सेवा आणखी उपयुक्त बनवण्यात डेटा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा डेटा जबाबदारीने हाताळण्यासाठी आणि कठोर प्रोटोकॉल व नाविन्यपूर्ण गोपनीयता तंत्रज्ञानांसह तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याची सुरुवात जगातील सर्वात प्रगत सुरक्षेपासून होते

जगातील एका सर्वात प्रगत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चरद्वारे Google उत्पादनांचे सातत्याने संरक्षण केले जाते. ही बिल्ट-इन सुरक्षा ऑनलाइन धोके आपोआप शोधते आणि ते रोखते, ज्यामुळे तुमची खाजगी माहिती सुरक्षित असल्याबद्दल तुम्ही खात्री बाळगू शकता.

प्रत्येक उत्पादन तयार करताना गोपनीयता प्रोटोकॉलचे पालन सक्तीने केले जाते

आमच्या उत्पादन तयार करण्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी गोपनीयतेची काटेकोर मानके असल्यामुळे आमच्या सर्व उत्पादनांच्या निर्माण-प्रक्रियेत गोपनीयता भिनलेली आहे. प्रत्येक उत्पादन आणि त्यातील वैशिष्ट्यांना व्यापक गोपनीयता मानकांना सामोरे जावे लागते आणि अशाप्रकारे या गोपनीयता मानकांचे पालन केले जाते.

आमच्या सर्व उत्पादनांमध्ये Google तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते ते पहा