परस्पर सहयोगाच्या माध्यमाने आरोग्य सेवा लवकर देणे
धोरणात्मक आरोग्य निराकरणे (SHS) टीम आरोग्य सेवेतील जटिल आव्हानांना हाताळण्यासाठी उत्सुक आहे. आमचे उपाय प्रत्यक्ष जगातील यूझ केस आणि भागीदारांच्या फीडबॅकवर आधारलेले असतात आणि आम्ही सतत शिकून त्यांत एकसारखी सुधारणा करत असतो. आमचे काम संपूर्ण उपायाच्या जीवनचक्रामध्ये चालते - गरज ओळखण्यापासून त्यासाठी उपाय तयार करणे, नंतर अधिकाधिक लोकांपर्यंत तो उपाय लवकरात लवकर पोचावा यासाठी व्यापक मदत करणे इथपर्यंत. यासाठी आम्ही आमच्या भागीदारांच्या सहयोगाने काम करतो ज्याने आम्ही तयार करत असलेली उत्पादने आणि सेवा ग्राहकांच्या, सेवाप्रदात्यांच्या आणि ते सेवा देतात त्या समुदायांच्या गरजा पूर्ण करतात याची खात्री होते.
आमचे ध्येय
Google ची उत्पादने आणि आरोग्याची एकूण परिस्थिती यांच्यासोबत जोडलेल्या संबंधांद्वारे जागतिक आरोग्यावर चांगला परिणाम करणारी उत्पादने आणि सेवा तयार करणे, त्यांचे प्रोटोटाइप करणे आणि त्यांचा वापर लवकर करता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे हेच धोरणात्मक आरोग्य निराकरणे टीमचे ध्येय आहे.
संधीची निवड
गरजा आणि सहकाऱ्यांची ओळख, तसेच एकंदर धोरणामध्ये अलाइनमेंट कसे आहे ते पाहून सहनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते.
निराकरणांची सहनिर्मिती
मूल्य आणि उत्पादनांच्या अटी यांना परिभाषित करणे, तसेच वापरकर्ता अनुभव व डिझाइन संशोधन यांच्यावरून उपाय व बाजारपेठ यांची योग्य सांगड घालणे यासाठी एकत्र काम केले जाते.
प्रोटोटाइप आणि चाचणी
तयार केलेले उत्पादन वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचे असल्याची खात्री करण्यासाठी व्हॅलिडेशन करणे आणि फीडबॅक गोळा करण्यासाठी अनेक वेळा चाचणी केली जाते.
मोठ्या प्रमाणात लाँच
वैविध्यपूर्ण लोकसंख्येच्या आरोग्यावर निराकरणाच्या प्रभावाला सपोर्ट करण्यासाठी सर्व उत्पादनांवर सर्वसमावेशक लाँच.
आरोग्यासंबंधी जागतिक आव्हानांचे एकत्र निराकरण करणे
आरोग्यासंबंधी जागतिक आव्हाने हाताळणाऱ्या नाविन्यपूर्ण उपायांचा शोध सुलभ करण्याचे काम SHS करते. आमचा असा विश्वास आहे, की वैविध्यपूर्ण कौशल्ये आणि संसाधने यांचा लाभ घेण्यासाठी Google चे विषय तज्ञ आणि उत्पादन तज्ञ, आघाडीच्या आरोग्य सेवा संस्था, आरोग्य मंत्रालये आणि शैक्षणिक संस्था यांसोबत भागीदारी करून सहकार्य करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आमच्या कामांची उदाहरणे आहेत :