गोपनीयता महत्त्वाची आहे
तुम्ही Google ची उत्पादने आणि सेवा वापरता तेव्हा, तुमच्या डेटाबाबत आमच्यावर विश्वास ठेवता. तुमचा डेटा खाजगी आणि सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी असते. तसेच Google Health येथे, आम्ही नवीन उत्पादने आणि सेवा तयार करत असताना आम्हाला गोपनीयता व सुरक्षेची पायाभूत तत्त्वे मार्गदर्शन करतात.
तुमची गोपनीयता जबाबदार डेटाविषयक कार्यपद्धतींद्वारे संरक्षित आहे
तुम्ही दररोज वापरत असलेली उत्पादने आणि सेवा आणखी उपयुक्त बनवण्यात डेटा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा डेटा जबाबदारीने हाताळण्यासाठी आणि कठोर प्रोटोकॉल व नाविन्यपूर्ण गोपनीयता तंत्रज्ञानांसह तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याची सुरुवात जगातील सर्वात प्रगत सुरक्षेपासून होते
जगातील एका सर्वात प्रगत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चरद्वारे Google उत्पादनांचे सातत्याने संरक्षण केले जाते. ही बिल्ट-इन सुरक्षा ऑनलाइन धोके आपोआप शोधते आणि ते रोखते, ज्यामुळे तुमची खाजगी माहिती सुरक्षित असल्याबद्दल तुम्ही खात्री बाळगू शकता.
प्रत्येक उत्पादन तयार करताना गोपनीयता प्रोटोकॉलचे पालन सक्तीने केले जाते
आमच्या उत्पादन तयार करण्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी गोपनीयतेची काटेकोर मानके असल्यामुळे आमच्या सर्व उत्पादनांच्या निर्माण-प्रक्रियेत गोपनीयता भिनलेली आहे. प्रत्येक उत्पादन आणि त्यातील वैशिष्ट्यांना व्यापक गोपनीयता मानकांना सामोरे जावे लागते आणि अशाप्रकारे या गोपनीयता मानकांचे पालन केले जाते.
आमच्या सर्व उत्पादनांमध्ये Google तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते ते पहा
-
Care Studio ची निर्मिती अशा प्रकारे केली गेली आहे की त्यात रुग्णांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हा डेटा कशा प्रकारे वापरला आणि प्रोसेस केला जाऊ शकतो यासाठी असलेल्या संपूर्ण उद्योगजगताने मान्य केलेल्या नियमांचे आणि सर्वोत्कृष्ट पद्धतींचे पालन केले जाते, या नियमांमध्ये HIPAA सामील आहेच. रुग्णांचा डेटा Google च्या मालकीचा नसतो आणि आम्ही कधीही तो डेटा विकत नाही. आम्ही माहितीचे संरक्षण करण्यासाठी प्रशासकीय, तांत्रिक आणि भौतिक सुरक्षेच्या उपाययोजना अंमलात आणतो.
अधिक जाणून घ्या
-
तुमच्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही Fitbit वर विश्वास ठेवता, त्यामुळे आम्ही खात्री करतो की तो डेटा सुरक्षित राहील, तसेच आम्ही कधीच त्याचा वापर जाहिरातींसाठी करत नाही. आम्ही कोणता डेटा गोळा करतो, आम्ही त्याचे संरक्षण कसे करतो आणि त्याला शेअर कसे केले जाते यावर आम्ही तुम्हाला कशा प्रकारे नियंत्रण करू देतो याबद्दल अधिक माहिती मिळवा.
अधिक जाणून घ्या
-
Google Cloud वर, ग्राहकासंबंधित डेटाची गोपनीयता आणि सुरक्षा हा डिझाइनचा प्राथमिक निकष असतो, ज्यावर आम्ही देऊ करतो त्या सर्व सेवा आधारित असतात. आम्ही आरोग्यासंबंधित माहितीचे तिच्या संपूर्ण लाइफसायकलमध्ये संरक्षण कसे करतो, तसेच Google Cloud मध्ये ग्राहकांना त्यांच्या डेटाच्या बाबतीत पारदर्शकता आणि त्यावरील नियंत्रण कसे देतो, ते येथे दिले आहे.
अधिक जाणून घ्या
-
तुम्ही Google Fit शी इतर अॅप्स कनेक्ट करता, तेव्हा तुमची फिटनेससंबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळते. तुमच्या फिटनेससंबंधित डेटासाठी एकच एंट्री पॉइंट म्हणून तुम्ही Google Fit वापरू शकता आणि त्या अॅप्ससोबत कोणता डेटा शेअर केला जातो ते नियंत्रित करू शकता.
अधिक जाणून घ्या
-
जर तुम्ही Google Health Studies च्या अभ्यासात नाव नोंदवण्याचे ठरवले, तर आम्ही तुमचा डेटा गोपनीय आणि संरक्षित ठेवण्यासाठी गुप्तता-संरक्षणाच्या पद्धती वापरतो. अभ्यासातील तुमचा डेटा Google विकत नाही किंवा त्याचा वापर तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी केला जात नाही. तुम्ही पाहिजे तेव्हा अगदी सहजपणे अभ्यासातून माघार घेऊ शकता. जर तुम्ही ॲप डिलीट केलात, तर तुमच्या फोनवरून अभ्यासाचा संपूर्ण डेटा डिलीट केला जातो.
अधिक जाणून घ्या
-
AI ची वाटचाल पुढे सुरू ठेवताना आणि संपूर्ण संशोधन समुदायासोबत टूल आणि संसाधने शेअर करताना गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी Google वचनबद्ध आहे. डेटा जबाबदारीने गोळा केला आणि हाताळला जावा यावर, आरोग्याच्या डेटाशी संबंधित जगभरातील कायदे, धोरणे आणि मानकांचे पालन करण्यावर, योग्य असेल तिथे डिव्हाइसवरील प्रोसेसिंगचा वापर करण्यावर आणि ML मॉडेल्सची गुप्तता सुरक्षित ठेवण्यावर आम्ही बारकाईने लक्ष देतो.
अधिक जाणून घ्या
-
Search ला मुद्दाम खाजगी ठेवले आहे. उद्योगजगतातील आघाडीचे तंत्रज्ञान वापरून आणि प्रत्येक शोध एन्क्रिप्ट करून आम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो. आम्ही अशी नियंत्रणे तयार केली आहेत जी तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग तुम्हाला निवडू देतात. तुमची वैयक्तिक माहिती आम्ही कधीच विकत नाही.
अधिक जाणून घ्या
-
तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरील निरनिराळ्या आरोग्य आणि फिटनेस अॅप्सदरम्यान डेटा स्टोअर आणि कनेक्ट करण्यासाठी Health Connect तुम्हाला अतिशय सोपा उपाय देते ज्यात कुठल्या अॅपकडे अॅक्सेस असावा यावर तुमचे नियंत्रण असते. Health Connect वापरून तुम्ही एकाच ठिकाणी सर्व परमिशन व्यवस्थापित करू शकता आणि कुठल्या अॅप कोणत्या वेळी डेटा अॅक्सेस करीत आहेत यावर तुमचे बारीक नियंत्रण असते. तुमचा डेटा कोणासोबत शेअर करायचा आणि कुठल्या प्रकारचा डेटा शेअर करायचा यावर सर्वस्वी तुमचे नियंत्रण असते.
अधिक जाणून घ्या
-
गोपनीयतेला महत्त्व देणारे घर तुमच्या फार कामास येते. आम्ही अशा डिव्हाइस आणि सेवा तयार करून तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी झटत आहोत ज्या असे घर निर्माण करतात जे त्यातील लोकांची आणि सभोवतालच्या जगाची काळजी घेते. तुमच्या बेड जवळच्या टेबलवर असलेल्याने Nest Hub (दुसरी जनरेशन) चे Sleep Sensing१ तुम्हाला जास्त आरामशीर अशी झोप येण्यात मदत करू शकते. तुम्ही पाहिजे तेव्हा Sleep Sensing बंद करू शकता. फक्त माइक बंद करण्यासाठी तुम्ही माइकचे स्विच बंद करू शकता. तुमच्या खोकण्याचा किंवा घोरण्याचा आवाज२ डिव्हाइसमध्येच राहतो. तुम्हाला खास जाहिराती दाखवण्यासाठी तुमच्या झोपेशी संबंधित डेटाचा वापर केला जा नाही आणि तुम्ही पाहिजे तेव्हा तो डेटा पाहून त्याला डिलीट करू शकता.
अधिक जाणून घ्या
१Sleep Sensing वैशिष्ट्यांची परवानगीआणि सेटिंग तुम्ही बदलू शकता. यांचे काम नीट होण्यासाठी मोशन, आवाज आणि डिव्हाइस व सेन्सॉरचा इतर डेटा वापरला जातो आणि यासाठी डिव्हाइसला बिछान्याजवळ ठेवणे आणि झोपेत असताना तुमच्या स्थितीशी कॅलिब्रेट करणे गरजेचे असते. संपूर्ण कार्यक्षमतेसाठी Google Assistant, Google Fit अॅप आणि Google च्या इतर अॅपची गरज असू शकते. Google Assstant साठी तुमच्या Google खात्याची गरज असते. तुम्ही myactivity.google.com वर जाऊन तुमच्या Assistant मधील अॅक्टिव्हिटी पारून डिलीट करू शकता. 2022 मध्ये Sleep Sensing वापरण्यासाठी कुठलाही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही. त्यानंतर 2023 पासून तुमच्या Fitbit Premium मध्ये Sleep Sensing इंटीग्रेट करावे अशी Google ची योजना आहे (सध्या दर महिन्याला $9.99 किंवा वर्षाला $79.99 लागतात, यात बदल होऊ शकतो आणि देशाप्रमाणे निराळी किंमत असू शकते). g.co/sleepsensing/preview वर अधिक माहिती मिळवा. हे पूर्वावलोकन संपल्यावर सब्सक्रिप्शन भरण्याची गरज असू शकते. २डिव्हाइस ठेवण्याची जागा, इतर लोक, पाळीव प्राणी किंवा इतर आवाजांमुळे चुकीच्या रीडिंग मिळू शकतात.
-
YouTube वरील तुमच्या अनुभवाचे नियंत्रण सर्वस्वी तुमच्या हाती असते. आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कधीच कोणालाही विकत नाही. आम्ही जाहिराती सेटिंग तुमच्या हातात देतो ज्यावरून तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसाव्यात किंवा जाहिरातींचे पर्सनलायझेशन असावे किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता.
अधिक जाणून घ्या