Google Search वर आरोग्य सेवेसंबंधित अपॉइंटमेंटची उपलब्धता

जवळपासचे आरोग्य सेवा पुरवठादार किंवा सुविधा शोधणाऱ्या लोकांना त्यांच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अपॉइंटमेंट थेट Google Search वर शोधण्यात मदत करण्याकरिता, Google वर आरोग्य सेवा व्यवसाय आणि डेटा पुरवठादार यांची उपलब्ध अपॉइंटमेंटसंबंधी माहिती इंटिग्रेट करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत भागीदारी करतो. Google Search वर तुमची अपॉइंटमेंटची उपलब्धता दाखवण्यासाठी साइन अप करा.

*हा प्रोग्राम सध्या फक्त यू.एस. मध्ये उपलब्ध असून पायलट टप्प्यामध्ये आहे. वरील फॉर्म भरून, तुम्हाला महत्त्वाच्या माइलस्टोनबाबत आणि प्रोग्राम सर्वसाधारणपणे उपलब्ध झाल्यावर सूचित केले जाईल.

Google Search वर आरोग्य सेवेसंबंधित अपॉइंटमेंटची उपलब्धता दाखवणारी फोनची इमेज
फोन डिव्हाइससोबत बसलेला, Google Search पेज दाखवणारा माणूस

अपॉइंटमेंट शोधणे हे सेवेच्या अ‍ॅक्सेसमध्ये सुधारणा करू शकते

आरोग्य सेवा शोधणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या शेड्यूल करिता अनुकूल असणारी अपॉइंटमेंट शोधणे हा एक सर्वात मोठा अडथळा असू शकतो. प्रत्यक्षात, यू.एस. मध्ये प्राथमिक सेवा अपॉइंटमेंटसाठी सरासरी प्रतीक्षा वेळ बरेचदा २० किंवा त्यापेक्षा अधिक दिवस असू शकते.

ते कसे काम करते

Google Search वर तुमचा व्यवसाय किंवा पुरवठादार पाहणाऱ्या कोणालाही उपलब्ध अपॉइंटमेंट दृश्यमान असतील. वापरकर्त्याने “बुक करा” बटणावर क्लिक केल्यावर, बुकिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना तुमच्या वेबसाइटवर निर्देशित केले जाईल. Google Search वर बुकिंग होत नाही.

व्यावसायिक, सुविधा, अपॉइंटमेंटचे प्रकार आणि उपलब्ध वेळा यांबद्दलच्या तपशीलवार माहितीसह, डेटा फीड ही सुरक्षित भागीदार पोर्टलद्वारे Google सोबत शेअर केली जातात

डेटा फीड आणि धोरणासंबंधी आवश्यकता यांच्या पालनासाठी, अंतर्गत Google सिस्टीम डेटाचे विश्लेषण करतात

Google Search वर फीडमधील उपलब्ध अपॉइंटमेंटचे प्रकार आणि तारखा दाखवल्या जातात

सेवा शोधणाऱ्या लोकांना तुमच्या वेबसाइटवर निर्देशित केले जाते आणि ते त्यावर बुकिंग पूर्ण करतात

सोपा सेटअप

अपॉइंटमेंट उपलब्धता वैशिष्ट्याशी इंटिग्रेट करण्यासाठी सेटअप आणि फीडकरिता डेटासंबंधी आवश्यकता येथे समजून घ्या. अपॉइंटमेंट धोरणांचा संपूर्ण संच तुम्हाला येथे दृश्यमान होण्यासाठी सापडू शकेल.

मुलगा वडिलांच्या मांडीवर बसला असून दोघेही हसत-खेळत आहेत.

वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न

अपॉइंटमेंट उपलब्धता वैशिष्ट्याबद्दल सर्वात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.

हे वैशिष्‍ट्य कुठे उपलब्ध आहे?

आमचे वैशिष्‍ट्य सध्या युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध आहे. तुमची संस्था युनायटेड स्टेट्सच्या बाहेर स्थित असल्यास, तुम्ही तुमचे स्वारस्य येथे रेकॉर्ड करू शकता आणि तुमच्या देशात वैशिष्ट्य उपलब्ध झाल्यावर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

Google सह अपॉइंटमेंटसंबंधी माहिती दाखवण्यासाठी या वैशिष्ट्याकरिता साइन अप करण्याशी संबंधित शुल्क आहे का?

नाही, Google Search वर अपॉइंटमेंटची उपलब्धता दाखवण्यासाठी Google हे भागीदारांकडून शुल्क घेत नाही.

वैशिष्‍ट्यासाठी कोणते भागीदार पात्र आहेत?

रुग्णाने आरोग्य सेवा पुरवठादार किंवा सुविधा यांसोबत स्वतः शेड्यूल करण्यास सपोर्ट करणारे भागीदार या वैशिष्ट्यासाठी पात्र आहेत. पात्र भागीदारांनी आमची धोरणे आणि डेव्हलपर दस्तऐवज यांचे पालन करणे आवश्यक असेल.

साइन अप प्रक्रिया काय आहे?

भागीदारांनी आमच्या डेव्हलपर दस्तऐवजांचे आणि धोरणांचे पुनरावलोकन केल्यावर, ते त्यांचे स्वारस्य येथे सबमिट करू शकतात. तुमच्या साइन अप प्रक्रियेमधील पहिली पायरी म्हणून पात्रता प्रश्नावली शेअर करण्यासाठी आमच्या टीमचा सदस्य संपर्क साधेल.