Google चा आरोग्य समन्याय संशोधन उपक्रम
आरोग्य समन्यायाला चालना देण्यासाठी आणि आरोग्य सेवांमधील असमानता कमी करण्यासाठी Google Health, Google Cloud Platform, Fitbit आणि Fitabase हे एकत्र काम करत आहेत. अमेरिकेतील शैक्षणिक संस्था आणि ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संशोधन संस्था यांच्यातील संशोधकांना Google Health समन्याय संशोधन उपक्रम, म्हणजेच Google Health Equity Research Initiative यामध्ये त्यांचे आरोग्य समन्याय संशोधन प्रस्ताव सबमिट करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. हा उपक्रम म्हणजे संशोधकांसाठी निधी, Google and Fitbit चे वियरेबल डिव्हाइस, Fitabase च्या सेवा आणि/ किंवा Google Cloud Platform क्रेडिट असे पुरस्कार मिळवण्याची संधी होती. आरोग्यासंबंधित असमानता आणि/ किंवा नकारात्मक सामाजिक व आरोग्याच्या संरचनात्मक निर्धारकांमुळे विपरीत परिणाम झालेल्या गटांसाठी आरोग्य समन्याय संशोधनाला पुढे नेणे आणि आरोग्यासंबंधित परिणामांमध्ये सुधारणा करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. साल 2023 च्या विजेत्यांची माहिती इथे पहा.