शोध परिणामांमधील मानसिक आरोग्यासंबंधी उपयुक्त स्व-तपासण्या
संभाव्य वैद्यकीय विकारांसंबंधी संशोधन करण्यासाठी लोक बरेचदा Google Search कडे वळत असल्यामुळे, चिकित्सालयांनी प्रमाणित केलेली बरीच स्व-तपासणी टूल आम्ही अनेक देशांमध्ये लाँच केली आहेत, जी वापरकर्त्याने मानसिक आरोग्य विकारांशी संबंधित माहिती शोधल्यावर दिसतात. आघातातोत्तर ताण विकार (PTSD) आणि नैराश्य यांसारख्या विकारांसाठी या स्व-तपासण्या आरोग्य सेवा व्यावसायिकांद्वारे सर्वसामान्यपणे वापरल्या जातात.
या विकारांसाठी चिकित्सालयांनी प्रमाणित केलेल्या स्व-तपासण्या उपलब्ध आहेत
अतिरिक्त माहिती आणि संसाधने
Google Search वर काही देशांमध्ये दिसणारी स्व-तपासणी टूल लक्षणांच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी माहिती पुरवतात, त्यासोबत इतर संसाधनांच्या लिंकदेखील असतात. स्व-तपासणीच्या अखेरीस, व्यक्तींना नेहमी त्यांच्या आरोग्य सेवा प्रदत्यांकडून अतिरिक्त मार्गदर्शन मिळवण्यासाठी निर्देशित केले जाते.
तुमची उत्तरे खाजगी आणि सुरक्षित आहेत
Google तुमच्या स्व-तपासणीतून उत्तरे किंवा परिणाम गोळा वा शेअर करत नाही. स्व-तपासणीच्या शेवटी लिंकवर केलेल्या क्लिक यासारखा वापर डेटा आम्ही गोळा करतो आणि आम्ही डेटा अशा प्रकारे वापरतो की ज्यामुळे तुमची ओळख तर उघड होत नाही शिवाय आमच्या गोपनीयता धोरणाचे पालन होते.