आणखी सुसज्ज सेवा देऊ करण्यात चिकित्सकांना मदत व्हावी यासाठी टूल आणि संसाधने वापरणे

सेवा देणाऱ्या टीमना त्यांच्या रुग्णांना अधिक चांगली, अधिक जलद तसेच अधिक कनेक्टेड सेवा देण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व उत्पादने पुरवण्यासाठी चिकित्सालयीन टूल आणि तंत्रज्ञान साधने देण्याचे काम आमची इंजिनियर, डॉक्टर, संशोधक आणि इतर आरोग्य सेवा तज्ञांची टीम करते.

लहान मुलाशी बोलणारे, मास्क लावलेले डॉ़क्टर
वॉकरवर वृद्धाचे आणि तरुणाचे हात

Care Studio हे चिकित्सालयीन वर्कफ्लो सुधारते

डॉक्टरांना योग्य वेळी योग्य माहितीचा जलद ॲक्सेस हवा असतो, पण रुग्णाशी संबंधित डेटा अनेकदा गुंतागुंतीचा, गोंधळात टाकणारा आणि वेगवेगळ्या सिस्टीममध्ये विखुरलेला असतो. Care Studio हे एक नवीन टूल आहे, जे चिकित्सकांना रुग्णाच्या आरोग्यासंबंधित विस्तृत इलेक्ट्रॉनिक माहितीमध्ये हायलाइट शोधण्याची, ब्राउझ करण्याची आणि पाहण्याची सुविधा देते, यासाठी ते संबंधित डेटाचे एकत्रितपणे अनुलंबी दृश्य पुरवते, जेणेकरून चिकित्सकांना रुग्णांची अधिक काळजी घेण्याकरिता जास्त वेळ मिळू शकेल.

नेत्र दृष्टिपटल इमेज

ARDA द्वारे दृष्टी-भिन्नक्षमता रोखण्यात मदत व्हावी यासाठी AI वापरणे

भारत आणि थायलंड येथील चिकित्सालयांमध्ये, या देशांमध्ये अंधत्वाचे प्रमुख कारण असलेल्या डायबेटिक रेटिनोपॅथी विकारासाठी स्क्रीन करण्यात आमचे Automated Retinal Disease Assessment टूल आरोग्य सेवा पुरवठादारांना मदत करत आहे, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लाखो रुग्णांना त्यांची दृष्टी कायम राखण्यात मदत होऊ शकते.

Google पुरवठादार

आरोग्य सेवा देण्याच्या पद्धती सुधारण्यात Google Cloud चिकित्सकांची मदत करते

आरोग्य सेवा आणि लाइफ सायन्सच्या संस्थांच्या व्यवसायांना नवीन स्वरूप देणे आणि त्यांचे डिजिटल रूपांतरण करण्याचे काम लवकर व्हावे यासाठी डेटावर आधारलेल्या नवीन कल्पनांच्या माध्यमाने आम्ही Google Cloud मध्ये प्रयत्न करीत आहोत. Google च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणारे एंटरप्राइझ दर्जाचे उपाय आम्ही देत आहोत जे उद्योग जगतातील सर्वात अधिक पर्यावरण-हितकर अशा क्लाउडवर आहेत. २०० पेक्षा अधिक देश व प्रदेशांतील ग्राहक आता स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यांच्या समोर असलेल्या गंभीर व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी Google Cloud कडे एक भरंवशाचा साथीदार म्हणून पहात आहेत.

रुग्णाच्या माहितीचे संरक्षण करणे

Google चिकित्सालयीन टूल उपयोजित करत असल्याने, आम्हाला माहीत आहे की तुमचा आरोग्य सेवेशी संबंधित डेटा संवेदनशील आणि वैयक्तिक आहे. तो खाजगी आणि सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही आमची उत्पादने HIPAA सह उद्योगातील सर्वोत्तम पद्धती आणि नियमांचे पालन करून डिझाइन करतो व आम्ही प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानासह माहितीचे संरक्षण करतो.