अधिक सुरक्षित आणि अधिक निरोगी होण्यात जागतिक समुदायांना मदत करणे
आरोग्यासंबंधी समन्याय आणि अॅक्सेसिबिलिटी यांचा प्रचार करणे हे सार्वजनिक आरोग्याचे लक्ष्य आहे, ज्यामुळे वैद्यक व्यवसायींना एखाद्या परिसराइतक्या लहान किंवा एखाद्या देशाइतक्या मोठ्या लोकसंख्यांवर लक्ष केंद्रित करता येते.
आज जगापुढे असलेली काही सर्वात मोठी आव्हाने हाताळण्यासाठी संशोधन आणि साधने पुरवून, Google हे सार्वजनिक आरोग्याबाबत प्रगती साधत आहे.
सार्वजनिक आरोग्य संस्थांना नवीन डेटा, टूल आणि इनसाइट पुरवून सक्षम करणे
सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांना त्यांच्या समुदायांना साहाय्य करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही डेटावर आधारित इनसाइट पुरवणारी टूल विकसित करतो.
COVID-19 संबंधित समुदाय मोबिलिटी अहवाल
सामाजिक अंतर आणि घरी राहण्यासंबंधी उपाययोजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यात धोरणनिर्मात्यांना मदत करणारे, एकत्रित केलेले, अॅनोनिमाइझ केलेले हालचालींमधील ट्रेंड.
हवेच्या गुणवत्तेची मापने
शहरांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या अधिक आरोग्यपूर्ण, अधिक शाश्वत शहरांमध्ये संक्रमण करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी, मार्ग दृश्य वाहने हवेची गुणवत्ता मोजतात.
पुराच्या अंदाजाची मॉडेल
सुधारित अंदाज मॉडेल जे पूर कधी आणि कुठे येईल याचा अंदाज लावण्यासाठी AI चा वापर करतात आणि ती माहिती Google Public Alerts मध्ये समाविष्ट करतात जेणेकरून व्यक्ती आणि अधिकारी चांगल्या प्रकारे तयारी करू शकतील.
COVID-19 लसीकरण अॅक्सेस डेटासेट
ज्या भागांमध्ये लोकांना लसी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा सोयीस्करपणे उपलब्ध नाहीत अशी "लसीकरणाची वाळवंटे" ओळखण्यात आणि ती हाताळण्यात सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकार्यांना मदत करण्यासाठी Vaccine Equity Planner टूलमध्ये वापरला जाणारा प्रवासाच्या वेळेसंबंधित डेटा.
COVID-19 लसीकरण शोध इनसाइट
सार्वजनिक आरोग्य संस्थांना त्यांच्या समुदायांच्या COVID-19 लसीकरणांसंबंधित गरजा आणि समस्या समजून घेऊन त्यांना प्रतिसाद देण्यासाठी, एकत्रित व अॅनोनिमाइझ केलेले शोध ट्रेंड.
सामाजिक आधारभूत संरचना योजना
राहण्याच्या व्यवस्थेच्या आसपास नोकर्या आणि परिसरातील सेवा असलेले मिश्र वापराचे गंतव्यस्थान ही सॅन होझे शहराची कल्पना प्रत्यक्षात आणण्यात मदत करण्यासाठी, आमची डाउनटाउन वेस्ट योजना. आरोग्याचे विविध सामाजिक निर्धारक हाताळणार असलेले शहरव्यापी समुदाय स्थिरीकरण आणि ऑपॉर्च्युनिटी पाथवे फंड यांसाठी समर्पित असलेल्या $१५ कोटींपेक्षा अधिक रकमेसह, योजनेमध्ये $२० कोटींच्या समुदाय लाभ पॅकेजचा समावेश आहे.
इंटेलिजंट लसीकरण प्रभाव निराकरण
आजाराचा अंदाज, सार्वजनिक आरोग्य मेसेजिंग अनॅलिटिक्स आणि लस वाहतूक व्यवस्थापन यांमार्फत समुदायांना लसी वितरित करण्यासाठी, आमच्या क्लाउड टीमनी स्थानिक, राज्य, प्रादेशिक व राष्ट्रीय सरकारांसोबत काम केले आहे.
Open Health Stack
यात डेव्हलपर्सना ओपन-सोर्स सॉफ्टवेअरच्या घटकांचा सुईट मिळतो ज्याने त्यांचा वेळ तर वाचतोच, त्यांना आरोग्य सेवेसंबंधी आधुनिक मानकांचा त्यात समावेश करणे अधिक सोपे होते. अशाने डेव्हलपर्स आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, ऑफलाइन चालू शकणारे आणि डेटावर आधारलेले उपाय तयार करू शकतात.
संशोधक आणि वैज्ञानिकांना सार्वजनिक आरोग्याच्या विज्ञानाची प्रगती साधण्यात साहाय्य करणे
सार्वजनिक आरोग्यासाठी मदतपर ठरतील अशा अभिनव इनसाइट शोधण्याकरिता वापरता येतील असे डेटासेट आणि टूल आम्ही संशोधकांना पुरवतो.
आरोग्य सेवेच्या जागतिक अॅक्सेसचा नकाशा
वाहतुकीची साधने नसल्यामुळे आरोग्य सेवा सुविधांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या असुरक्षित समुदायांना ओळखून, जगभरात अशा सुविधांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेचे नकाशे तयार करण्यात मदत केली.
COVID-19 संबंधित शोध ट्रेंड लक्षणांचा डेटासेट
जागतिक साथीचा प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करण्यासाठी संशोधकांना लक्षणांसंबंधित शोध आणि COVID-19 चा प्रसार यांदरम्यानच्या लिंकचा अभ्यास करू देणारे, ४२० पेक्षा जास्त लक्षणे आणि आजारांसाठी शोध ट्रेंड.
COVID-19 संबंधित मुक्त डेटा रीपॉझिटरी
सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक, संशोधक, धोरणनिर्माते आणि इतरांना विषाणूचे विश्लेषण करण्यात, तो समजून घेण्यात व व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी, COVID-19 संबंधित अप-टू-डेट माहितीचा एक सर्वात व्यापक संग्रह.
अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवण्यात समुदायांना मदत करणे
आम्ही समुदायांना योग्य क्षणी उच्च गुणवत्तेची माहिती मिळवण्यात मदत करतो, जेणेकरून त्यांना सुरक्षितता आणि लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करता येईल.
सार्वजनिक सेवा जाहिराती
सार्वजनिक आरोग्यविषयक जाहिरात मोहिमांमधून लोकांना महत्त्वाची माहिती देण्यात Google Ads हे आरोग्य संस्थांना मदत करते.
YouTube वरील आरोग्यासंबंधित अधिकृत माहिती
लोकांना त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात मदत करण्यासाठी विश्वासार्ह माहिती शोधणे आणखी सोपे करण्याकरिता, YouTube हे आरोग्य तज्ञांसोबत काम करते.
COVID-19 लागणीबद्दलच्या सूचना
संसर्ग कमी करण्यात मदत होण्यासाठी, COVID-19 असलेल्या व्यक्तीपासून लागण झालेली असू शकणार्या लोकांना सूचित करण्यात लागणीबद्दलच्या सूचना सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांना मदत करतात.
गोपनीयता ही सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामधील आमच्या सर्व कामाच्या केंद्रस्थानी असते
भेददर्शी गोपनीयतेसारख्या तंत्रज्ञानांमार्फत, आम्ही डेटा हाताळणीसंबंधी औद्योगिक मानकांमध्ये प्रगती साधत आहोत. डेटा उपयुक्त बनवण्याबाबत गोपनीयतेला प्राधान्य देणार्या आमच्या दृष्टिकोनामुळे, आमच्या कामाला फ्युचर ऑफ प्रायव्हसी फोरम यासारख्या पुरस्कर्त्यांद्वारे मान्यता दिली गेली आहे.
आरोग्य समन्याय हे आमच्या सार्वजनिक आरोग्यासंबंधित प्रयत्नांचे मूलभूत ध्येय आहे
लोक कुठेही जन्मले असले, राहत असले, काम करत असले, शिकत असले, खेळत असले किंवा वृद्ध होत असले, तरीही सर्वांना, सर्वत्र अधिक निरोगी जीवन जगण्यात मदत करणे हे आमचे ध्येय आहे. ही दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी, आम्ही आरोग्य समन्यायाचा प्रचार करण्याकरिता आणि आरोग्यासंबंधी असमानता तसेच आरोग्याच्या संरचनात्मक व सामाजिक निर्धारकांना चालना देणार्या गोष्टींवर परिणाम करण्याकरिता काम करत आहोत. अधिक जाणून घ्या