The Check Up
with
डॉ. कॅरन डिसाल्व्हो, आमच्या मुख्य आरोग्य अधिकारी आणि संपूर्ण Google मधील इतर टीमकडून आकर्षक उत्पादनांच्या लाँचविषयी, भागीदारीच्या घोषणांविषयी आणि निरोगी राहण्यात अब्जावधी लोकांना मदत करणे यासाठीच्या Google Health या आमच्या कंपनीव्यापी प्रयत्नामधील नवीनतम प्रयोगांविषयी ऐकण्याकरिता १४ मार्च २०२३ रोजी ET वेळेनुसार सकाळी ११:०० वाजता ट्यून इन करा.
निरोगी राहण्यात अब्जावधी लोकांना मदत करण्यासाठीच्या Google Health या आमच्या कंपनीव्यापी प्रयत्नाविषयी जाणून घेण्यासाठी, तुमच्याकडून राहून गेलेल्या गोष्टींबाबत माहिती मिळवा किंवा मागणीनुसार सेगमेंट पुन्हा पहा.
आमच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. कॅरन डिसाल्व्हो आणि संपूर्ण Google मधील इतर टीम्सकडून संशोधनातील नवीन प्रयोग, भागीदारीच्या घोषणा आणि नवीन उत्पादनांच्या लाँच या सर्वांच्या माध्यमाने आरोग्य क्षेत्रामध्ये AI कसे बदल घडवून आणू शकते याबद्दल माहिती मिळवा.
आगामी इव्हेंट
मागील इव्हेंट
The Check Up '२४ मधील हायलाइट | Google Health
संशोधन क्षेत्रातील आकर्षक प्रयोग, भागीदारीशी संबंधित घोषणा आणि नवीन उत्पादन लाँच यांद्वारे, Google येथील आरोग्य क्षेत्रातील AI च्या परिवर्तनकारी क्षमतेबद्दल राउंडअप पहा.
Google Health सोबत The Check Up २०२४
आमच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. कॅरन डिसाल्व्हो आणि संपूर्ण Google मधील इतर टीमकडून संशोधन क्षेत्रातील आकर्षक प्रयोग, भागीदारीशी संबंधित घोषणा व नवीन उत्पादन लाँच यांद्वारे आरोग्य क्षेत्रातील AI च्या परिवर्तनकारी क्षमतेबद्दल जाणून घ्या.
तुमचे अनेक पैलू आहेत : आरोग्य सेवेचे भविष्य आणि AI
तुम्ही पूर्णतः युनिक आहात आणि तुमचा आरोग्यविषयक प्रवासदेखील तसाच असायला हवा. आम्हाला असे वाटते, की AI हे जागतिक पातळीवर आणखी पर्सनलाइझ केलेली, अनुकूल केलेली आरोग्यविषयक सेवा पुरवण्यात आरोग्य सेवा पुरवठादारांना सक्षम करून, आरोग्य सेवेमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. लवकरच काय शक्य होऊ शकते हे पहा.
आरोग्य सेवेमध्ये परिवर्तन घडवण्याची AI ची क्षमता
डॉ. कॅरन डिसाल्व्हो The Check Up with Google Health चा परिचय करून देत आहेत आणि आरोग्य सेवेच्या भविष्याला सपोर्ट करण्यासाठी Google कसे काम करत आहे हे शेअर करत आहेत.
MedLM हे प्रयोगांना कशी चालना देत आहे
योसी माटियास Google चे भागीदार MedLM यांच्याबद्दल अपडेट शेअर करून हे सांगत आहेत की त्यांची आरोग्य समन्यायातील प्रगती कशी सुरू आहे.
Google Cloud आणि HCA हेल्थकेअर हे GenAI चा वापर करत आहेत
डॉ. मायकल श्लॉसर, HCA हेल्थकेअरमधील केअर ट्रांस्फॉर्मेशन अँड इनोव्हेशनचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि आशिमा गुप्ता सांगत आहेत की त्यांच्या एकत्र मिळून केलेल्या कामाचे उद्दिष्ट Google च्या अत्याधुनिक AI ची सांगड HCA हेल्थकेअरच्या प्रत्यक्ष चिकित्सालयीन ज्ञानासोबत घालून देणे आहे. यामुळे रुग्णांच्या व आरोग्य सेवा देणाऱ्या टीम्सच्या खऱ्या गरजांसाठी प्रभावी, अर्थपूर्ण उपाय तयार होतात.
आमचे नवीनतम GenAI संशोधन आणि भागीदारी
ग्रेग कोराडो हे मेयो क्लिनिक आणि बेथ इस्रायल डीकनेस मेडिकल सेंटर यांसारख्या भागीदारांसोबतचे जनरेटिव्ह AI मधील नवीनतम प्रयोगशील काम शेअर करत आहेत.
इतरांना समानतेने निर्मिती करण्यास सशक्त करणे
अधिक निष्पक्ष उत्पादने तयार करण्यात आरोग्य सेवेशी संबंधित व्यवस्थेला मदत व्हावी, यासाठी डॉ. आयव्हर हॉर्न नवीन प्रोजेक्ट सादर करत आहेत -- आम्ही स्टॅनफोर्डसोबत रिलीझ करत असलेला त्वचारोगशास्त्रासंबंधित डेटासेट, तसेच AI मॉडेलच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठीचे फ्रेमवर्क.
AI हे भारतामध्ये निदान करण्यात मदत करत आहे आणि जीनोमिक्ससंबंधित संशोधनात सुधारणा करत आहे
TB, फुफ्फुसाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांसाठीची AI द्वारे सक्षम केलेली स्क्रीनिंग आणखी समुदायांपर्यंत पोहोचवण्याकरिता भारतामधील अपोलो हॉस्पिटल्ससोबत केलेला सहयोग श्राव्या शेट्टी या इंजिनियरिंग लीड सादर करत आहेत. तसेच, जीनोमिक्ससंबंधित आमच्या कामाविषयी त्या नवीनतम माहिती शेअर करत आहेत.
Google Search आणि Lens वर आरोग्यासंबंधित माहिती आणखी अॅक्सेसिबल करत आहे
केट ओ'रायर्डन या Google Search वरील अशा नवीनतम अपडेटविषयी बोलत आहेत, ज्यांमुळे लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत आणि आरोग्यविषयक सेवेबाबत निर्णय घेण्यासाठी गरजेची माहिती शोधणे सोपे होईल.
AI वापरून अॅक्सेस वाढवत आहे
गार्थ ग्रॅहम हे AI द्वारे सक्षम केलेल्या, YouTube च्या अशा निःशुल्क डबिंग टूलविषयी नवीनतम माहिती शेअर करत आहेत, जे व्हिडिओच्या भाषांतराची आणि डबिंगची प्रक्रिया स्ट्रीमलाइन करते, ज्यामुळे क्रिएटर्सना अधिक लोकांपर्यंत त्यांचे काम पोचवता येते.
Google AI तुमच्या हातात
फ्लो थंग या Fitbit आणि Pixel मधील नवीनतम AI प्रयोग शेअर करत आहेत व त्यांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा चेहरामोहरा कसा बदलत आहे याविषयी चर्चा करत आहेत.
चेक अप २०२३ मधील हायलाइट
अधिक निरोगी राहण्यात अब्जावधी लोकांना मदत करण्याचे आमचे कंपनीव्यापी प्रयत्न साध्य करण्यासाठी Google कसे काम करत आहे त्याचा राउंडअप पहा. Health AI, Search, YouTube, Fitbit, Cloud आणि इतर गोष्टींबाबत नवीनतम अपडेट मिळवा.
Google Health २०२३ सोबत चेक अप
डॉ. कॅरन डिसाल्व्हो, आमच्या मुख्य आरोग्य अधिकारी आणि संपूर्ण Google मधील इतर टीमकडून आकर्षक उत्पादनांच्या लाँचविषयी, भागीदारीच्या घोषणांविषयी आणि निरोगी राहण्यात अब्जावधी लोकांना मदत करण्यासाठीच्या Google Health या आमच्या कंपनीव्यापी प्रयत्नामधील नवीनतम प्रयोगांविषयी ऐका.
आरोग्याचे भविष्य
डॉ. कॅरन डिसाल्व्हो Google Health सोबत चेक अप चा परिचय करून देतात आणि आरोग्याच्या भविष्याला सपोर्ट करण्यासाठी Google कसे काम करत आहे ते शेअर करतात.
आरोग्यावर AI चा परिवर्तनकारी परिणाम
योसी मतियास हे आरोग्य सेवेमध्ये Google च्या AI च्या कामाचा परिणाम याबाबत त्यांचा स्वतःचा अनुभव आणि त्यांची भविष्यासाठी उत्सुकता शेअर करतात.
आरोग्य AI मधील नावीन्यपूर्ण संशोधन
डॉ. ॲलन कार्तिकेशलिंगम हे वैद्यकीय प्रश्नांना उच्च गुणवत्तेची, अधिकृत उत्तरे पुरवण्यासाठी लार्ज लँग्वेज मॉडेलसह केलेल्या Med-PaLM 2 या आमच्या समन्वेषक कामाबाबत नवीन संशोधनाचा परिचय करून देतात.
आरोग्य AI मध्ये संशोधनापासून वास्तवापर्यंत जाण्यासाठी भागीदारी करणे
ग्रेग कोराडो हे प्रत्यक्ष जगातील आरोग्यासंबंधी सेटिंग्जमध्ये AI निराकरणे आणून परिणामांना चालना देण्यासाठी आम्ही भागीदारांसोबत काम कसे करत आहोत याबद्दल बोलत आहेत.
YouTube वर आरोग्याचे निर्धारक म्हणून माहिती
माहिती हे आरोग्यासंबंधी वाढत्या महत्त्वाचे प्रेरक हाताळण्यासाठी YouTube वापरत असलेल्या मार्गांची डॉ. गॉर्थ ग्रॅहम चर्चा करत आहेत.
YouTube वरील आरोग्य सेवा निर्माणकर्ते
आम्ही जगभरातील काही पडताळणी केलेल्या YouTube आरोग्य सेवा निर्माणकर्त्यांना ते तिचा वापर मोठ्या प्रमाणात शिक्षण देण्यासाठी कसा करतात हे शेअर करण्यास सांगितले.
Google Search वर आरोग्याचे निर्धारक म्हणून माहिती
हेमा बुडाराजू या लोकांना त्यांचे आरोग्य आणि सेवा यांबद्दल निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती शोधणे आणखी सोपे करणार असलेल्या Google Search वरील नवीन वैशिष्ट्यांबद्दल बोलत आहेत.
मोबाइल आणि वेअरेबल सेन्सिंग यांची स्थिती
अनुपम पाठक हे मोबाइल आणि वेअरेबल सेन्सिंगमधील संशोधन, AI मधील नावीन्ये आणि या तंत्रज्ञानांचा वापरकर्त्यांवर परिणाम यांबद्दल अपडेट शेअर करत आहेत.
तंत्रज्ञान वापरून केन्यामधील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना सक्षम करणे
सादर करत आहोत Open Health Stack, नेक्स्ट-जेन आरोग्य सेवा अॅप्स तयार करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉकचा स्वीट. IntelliSOFT ने केन्यामध्ये रुग्ण, समुदाय आरोग्य स्वयंसेवक आणि आरोग्य सिस्टीम यांना सक्षम करणारे Mama’s Hub हे प्रसूतीसंबंधी आरोग्य अॅप तयार करण्यासाठी Open Health Stack कसे वापरले त्याबद्दल अधिक जाणून घ्या.
सादर करत आहोत Open Health Stack
कॅथरीन चाऊ Open Health Stack या नेक्स्ट-जेन आरोग्य सेवा अॅप्स तयार करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉकच्या स्वीटचा परिचय करून देतात. WHO ने Open Health Stack च्या डेव्हलपमेंटला कसा आकार दिला आणि डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानांचे महत्त्व यांची चर्चा करण्यासाठी WHO येथील प्रोफेसर अॅलेन लॅब्रिक त्यांच्यासोबत सामील होत आहेत.
Google Cloud जीवन विज्ञाने फायरसाइड चॅट
श्वेता मणियार या Bayer Radiology येथे इमेजिंग, डेटा आणि प्लॅटफॉर्म सेवा यांचे प्रमुख असलेल्या मार्कस ब्लँक यांच्यासोबत Google Cloud सह लाँच करण्याच्या कल्पनेपासूनच्या मार्गाला गती देण्यासाठी एकत्र काम करण्याबद्दल चॅट करतात.
हवामान बदलाचे सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम कमी करणे
मानसी कंसल या हवामान बदलाचे सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम कमी करण्यात मदत करण्यासाठी Google येथील प्रोजेक्टची चर्चा करतात.
चेक अप २२ | Google Health
Google ने पाहिलेले अब्जावधी निरोगी लोकांचे स्वप्न साकार करण्यासाठी ते कसे काम करत आहे याबाबत डॉ. कॅरन डिसाल्व्हो आणि Google Health चे भागीदार यांना चर्चा करताना पहा. Fitbit, Search, YouTube, Health AI, Cloud आणि इतरांकडून नवीनतम अपडेट मिळवा.
चेक अप २२ | Google Health
Google ने पाहिलेले अब्जावधी निरोगी लोकांचे स्वप्न साकार करण्यासाठी ते कसे काम करत आहे याबाबत डॉ. कॅरन डिसाल्व्हो आणि Google Health चे भागीदार यांना चर्चा करताना पहा. Fitbit, Search, YouTube, Health AI, Cloud आणि इतरांकडून नवीनतम अपडेट मिळवा.
हृदय निरोगी ठेवण्यात Fitbit कशा प्रकारे मदत करते
जेम्स पार्क अॅट्रिअल फिब्रिलेशनवरील त्यांचे काम आणि Fitbit च्या नवीन घडामोडींबद्दल बोलत आहेत.
आरोग्यासंबंधी माहिती आणि सेवेच्या उपलब्धतेमध्ये Google कशा प्रकारे सुधारणा करत आहे
लोकांसाठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी योग्य असलेली आरोग्यासंबंधी माहिती व सेवा मिळवण्यात त्यांना मदत करणारे Google Search चे COVID-19 संबंधित नवीन प्रयोग आणि इतर वैशिष्ट्ये हेमा बुडाराजू शेअर करत आहेत.
YouTube सर्वांसाठी आरोग्यविषयक दर्जेदार माहिती कशा प्रकारे उपलब्ध करून देत आहे
YouTube अधिकृत आरोग्य भागीदारांसोबत कसे काम करत आहे आणि माहितीची गुणवत्ता व माहिती समन्याय यांवर कसे लक्ष केंद्रित करत आहे याबद्दल डॉ. गॉर्थ ग्रॅहम बोलत आहेत.
प्रत्येकासाठी सर्वत्र आरोग्य सेवा आणखी ॲक्सेसिबल बनवणे
योसी माटियास हे ARDA, DermAssist आणि मोबाइल परिमाणे यांसंबंधित AI संशोधनामधील नवीन घडामोडींची घोषणा करत आहेत. भविष्यात स्मार्टफोन डोळे आणि हृदयासंबंधित आजारांसंदर्भात कशा प्रकारे मदत करू शकतील यावर लक्ष केंद्रित करणारे दोन नवीन प्रकल्प ते शेअर करत आहेत.
ATAP आणि UCSF: वेअरेबल व AI संशोधन, गुडघे बदलण्यासंबंधित प्रक्रियांमध्ये सुधारणा
शस्त्रक्रियेचे परिणाम समजून घेण्यात UCSF आणि ATAP यांमधील संशोधन भागीदारी कशा प्रकारे मदत करत आहे याबद्दलचा अनुभव आयव्हन पुपिरेव्ह व डॉ. स्टेफनो बिनी शेअर करत आहेत.
आरोग्य सेवेमधील इंटरऑपरेबिलिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी Googe कसे काम करते आहे
डॉ. चार्ल्स डिशेझर, आशिमा गुप्ता आणि हियन ब्राउन MEDITECH च्या माइक कोर्डेइरो यांसोबत रुग्णाच्या परिणामांमध्ये इंटरऑपरेबिलिटीच्या महत्त्वाबद्दल चर्चा करत आहेत.
Google Health आणि WHO: FHIR आधारित निराकरणे शोधण्यासाठी डेव्हलपरना मदत करणे
रुग्णाला केंद्रस्थानी ठेवणारी सेवा सुरू करण्यासाठी Google आणि WHO एकत्र कशा प्रकारे काम करत आहेत व आरोग्यासंबंधित नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याकरिता डेव्हलपर SDK कसे वापरत आहेत यावर कॅट चाउ आणि गॅरेट मेल चर्चा करत आहेत.
प्रसूतीसंबंधित आरोग्य सुधारण्यासाठी Google ची वचनबद्धता
Northwest Medicine सोबतच्या आमच्या प्रसूतीसंबंधी आरोग्य भागीदारीतील नवीनतम कामाबद्दल डॉ. आयव्हर हॉर्न बोलत आहेत. डॉ. लेशे अजायी या गर्भवतींना त्यांचा प्रसूतीसंबंधित डेटा वैज्ञानिकांसोबत शेअर करू देणाऱ्या PowerMom या स्मार्टफोन अॅपवर आधारित त्यांच्या संशोधन अभ्यासाची माहिती देत आहेत.
चेक अप २०२१ | Google Health
आरोग्य सेवेतील सर्वात मोठी आव्हाने हाताळण्यासाठी आणि सर्वाधिक निरोगी जीवन जगण्यात लोकांना मदत करण्यासाठी, Google कसे काम करत आहे याबाबत डॉ. डेव्हिड फाइनबर्ग, डॉ. कॅरन डिसाल्व्हो व Google Health चे भागीदार चर्चा करत आहेत. Google चा COVID-19 संबंधित प्रतिसाद, AI तंत्रज्ञान डॉक्टरना कशी मदत करू शकते आणि आरोग्य सेवेमध्ये मोबाइल तंत्रज्ञान कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकते यांबद्दल अधिक जाणून घ्या.
चेक अप २०२१ | Google Health
आरोग्य सेवेतील सर्वात मोठी आव्हाने हाताळण्यासाठी आणि सर्वाधिक निरोगी जीवन जगण्यात लोकांना मदत करण्यासाठी, Google कसे काम करत आहे याबाबत डॉ. डेव्हिड फाइनबर्ग, डॉ. कॅरन डिसाल्व्हो व Google Health चे भागीदार चर्चा करत आहेत. Google चा COVID-19 संबंधित प्रतिसाद, AI तंत्रज्ञान डॉक्टरना कशी मदत करू शकते आणि आरोग्य सेवेमध्ये मोबाइल तंत्रज्ञान कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकते यांबद्दल अधिक जाणून घ्या.
Google चा COVID-19 संबंधित प्रतिसाद
Google Health च्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. कॅरन डिसाल्व्हो यांनी YouTube चे डॉ. गॉर्थ ग्रॅहम आणि Verily चे डॉ. रॉब कॅलिफ यांना YouTube, Google Health व Verily या Google च्या वेगवेगळ्या भागांनी COVID-19 संबंधित प्रतिसाद देण्यात कशा प्रकारे सहयोग दिला आहे याबाबत इनसाइट शेअर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
चिकित्सकांसाठी आरोग्य सेवा डेटा संगतवार लावणे
Google Health च्या उत्पादन आणि डिझाइन विभागाचे VP पॉल म्युरेट यांनी Ascension येथील मुख्य चिकित्सालयीन अधिकारी डॉ. रिचर्ड फॉगल यांच्यासोबत केलेल्या संभाषणामध्ये सामील व्हा, जिथे ते त्यांची भागीदारी आरोग्यासंबंधित माहिती अधिक अॅक्सेसिबल व उपयुक्त कशी बनवत आहे याबाबत चर्चा करत आहेत.
AI तंत्रज्ञान डॉक्टरना कशी मदत करू शकते
जागतिक कर्करोग दिनी, Google Health UK चे संशोधन प्रमुख डॉ. ॲलन कार्तिकेशलिंगम हे कर्करोगावरील उपचारांमध्ये सुधारणा करण्यासाठी AI कसे वापरता येईल याबाबत मेयो क्लिनिक स्कूल ऑफ मेडिसिन येथील डॉ. ख्रिस बेलट्रान आणि कर्करोग रुग्ण सूझान स्टीअर यांच्यासोबत दृष्टिकोन शेअर करत आहेत.
मधुमेहासाठी डोळ्यांची तपासणी अधिक सुलभ करणे
मधुमेह हा जगभरातील ४१.५ कोटी लोकांवर परिणाम करणारा आजार आहे, ज्यांपैकी प्रत्येकाला मधुमेही दृष्टिपटल विकार होण्याचा धोका असतो, ज्यामुळे अंधत्व येऊ शकते. Google Health चे उत्पादन व्यवस्थापक सनी वीरमणी हे भारतामधील शंकर नेत्रालयाचे डॉ. रमण आणि थायलंडमधील राजाविथी हॉस्पिटलचे डॉ. पायसन या संशोधकांसोबत आरोग्य सेवेमधील त्रुटी दूर करण्यासंबंधित AI तंत्रज्ञानाच्या भूमिकेबाबत चर्चा करतात.
तुम्हाला आरोग्य सेवेसंबंधित प्रवासात नेव्हिगेट करण्यात मदत करणे
लोकांना त्यांच्या आरोग्य सेवेच्या प्रवासात सक्षम करण्यासाठी Google Health हे सध्याच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ऑनलाइन टूल तयार करण्यासाठी कसे काम करत आहे याची पडद्यामागील दृश्ये Google Health चे मायकल हॉवल, टॉड मॅक्यिअन, दिव्या पद्मनाभन व जॅकलिन श्राइबाती दाखवत आहेत.
मोबाइल फोन तंत्रज्ञान आरोग्य सेवेमध्ये कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकते
Google Health येथील आरोग्य तंत्रज्ञान संचालक श्वेतक पटेल हे मोबाइल परिमाणांना आधार देणार्या सेन्सर तंत्रज्ञानामधील अलीकडील प्रगतीबाबत उत्साहवर्धक बातमी शेअर करत आहेत.
Android हे अधिक समावेशक आणि प्रातिनिधिक अभ्यास कसे सुरू करू शकते
Google Health Studies Android अॅप आणि श्वसनासंबंधित सुरुवातीच्या अभ्यासामधील त्यांची भागीदारी यांबाबत, हार्वर्ड मेडिकलचे जॉन ब्राउनस्टाइन हे Google Health चे उत्पादन व्यवस्थापक जॉन मॉर्गन यांच्यासोबत उत्साहपूर्ण चर्चेमध्ये सामील होत आहेत.