अब्जावधी लोकांना निरोगी राहण्यात मदत करणे
Google Health हे आरोग्यासंबंधित माहिती पुरवणे आणि याला अधिक चांगले बनवणारी उत्पादने व सेवांद्वारे सर्वांना निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही लोकांना निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी महत्त्वाची माहिती देणारी उत्पादने तयार करतो. आम्ही आरोग्य सेवेशी संबंधित टीमना आणखी कनेक्ट केलेली सेवा डिलिव्हर करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित निराकरणे डेव्हलप करत आहोत. तसेच आम्ही कर्करोगाचे निदान करण्यासाठी, अंधत्व रोखण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराची शक्यता पडताळून पाहत आहोत.