Google Search वर उच्च गुणवत्तेची, आरोग्यासंबंधित सुसंगत माहिती आणि सेवा यांचा अ‍ॅक्सेस

माहिती ही सक्षमतेची पायरी आहे असे आमचे ठाम मत आहे आणि आरोग्याच्या बाबतीत तर हे विशेष खरे आहे. लहान आणि मोठ्या दोन्ही स्तरांवर आम्ही सर्वांनाच महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ज्याने ते स्वतःला आणि त्यांच्या प्रियजनांना सुखरूप ठेवू शकतील.

Google Search वर आरोग्य सेवेसंबंधित अपॉइंटमेंटची उपलब्धता दाखवणारी फोनची इमेज
लोकांना मदत करणे

लोकांना अशा स्रोतांकडून आरोग्यासंबंधी माहिती मिळवून देणे ज्यांवर त्यांचा विश्वास आहे

जगभरात लोक Google Search वापरून आजार, लक्षणे आणि उपचारांबद्दल विश्वासार्ह आणि योग्य माहिती शोधतात. आमच्या माहिती पॅनल्समध्ये शेकडो आजारांबद्दल अधिकृत स्रोतांकडून मिळालेली माहिती असते, यात साध्या सर्दीपासून स्नायूंचा ताण, डोकेदुखी, काळजी आणि अशा अनेक बाबींची माहिती असते. जेव्हा तुम्ही लक्षणांबद्दल माहिती शोधता, तेव्हा आम्ही त्यासंबंधी इतर विकारांची यादी दाखवतो ज्यामुळे तुम्हाला लगेच माहिती मिळते की तुम्हाला अधिक सखोल माहिती कुठून मिळेल किंवा डॉक्टरांशी संपर्क कसा साधता येईल.

आरोग्यासंबंधी कोट्यावधी प्रश्नांची उत्तरे दररोज दिली जातात

अमेरिकेमध्ये तीन चतुर्थांश लोक आरोग्यासंबंधी माहिती शोधण्यासाठी आधी इंटरनेटकडे वळतात. युरोपमधील अर्ध्यापेक्षा अधिक लोक आरोग्यासंबंधी माहिती ऑनलाइन शोधतात आणि ही संख्या वाढतेच आहे. म्हणूनच लोकांना, त्यांना गरज असेल तेव्हा आणि गरज असेल तिथे योग्य आणि आधिकारिक माहिती पुरवणे हे आमचे ध्येय आहे, तुम्ही Google वर कुठलीही माहिती शोधत असलात तरीही.

अमेरिकेमध्ये तीन चतुर्थांश लोक आरोग्यासंबंधी माहिती शोधण्यासाठी आधी इंटरनेटकडे वळतात.

SAGE जर्नल

युरोपमधील अर्ध्यापेक्षा अधिक लोक आरोग्यासंबंधी माहिती ऑनलाइन शोधतात.

Eurostat

लोकांना आरोग्य सेवा देणाऱ्यांशी कनेक्ट करणे

अमेरिकेत लोकांना आरोग्य सेवा शोधण्यातील महत्त्वाचे पैलू नेविगेट करणे आम्ही सोपे करत आहोत. आम्ही लाखो आरोग्य सेवा पुरवठादारांची माहिती गोळा केली आहे ज्यामुळे आता वापरकर्ते त्यांच्यासाठी योग्य अशी सेवा अधिक सोप्या रीतिने शोधू शकतात, तसेच ते पाहू शकतात की एखाद्या पुरवठादारांकडे त्यांचा विमा स्वीकारला जाईल किंवा नाही आणि त्यांच्याकडे अपॉइंटमेंटसाठी तारखा उपलब्ध आहेत किंवा नाही.

अशा लोकांसाठी अ‍ॅक्सेस अधिक सोपा करणे ज्यांना याची सर्वात जास्त गरज आहे

आरोग्य सेवेचा अ‍ॅक्सेस अधिक लोकांना सहज मिळावा यात मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि आम्ही अमेरिकेमध्ये सरकारी विमा कार्यक्रमांबद्दल अधिक व्यवस्थित माहिती देणे सुरू केले आहे. या माहितीमध्ये या कार्यक्रमांसाठी पात्रतेच्या अटी आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आहेत, ज्यामुळे मर्यादित मिळकत व संसाधने असलेल्या लोकांना आरोग्य सेवा मिळू शकेल. तसेच आम्ही Medicaid व Medicare स्वीकारणाऱ्या जवळ-पासच्या पुरवठादारांना शोधून फिल्टर करण्यासाठी टूल सुद्धा तयार केले आहेत.

मानसिक आरोग्यासाठी अधिक चांगल्या दर्जाची संसाधने

आणीबाणीच्या प्रसंगी लोक बरेचदा शोध एंजिनची मदत घेतात. विश्वासार्ह स्रोतांकडून योग्य माहिती मिळवून देण्यासोबतच आम्ही असुरक्षित लोकांची मदत करण्यासाठी झटपट, गोपनीय आणि विश्वासार्ह संसाधने हायलाइट करतो. आत्महत्या आणि कौटुंबिक हिंसा यासारख्या विषयांना पुढे आणण्यासाठी आणीबाणीच्या वेळी हॉटलाइनची माहिती देण्यासाठी आम्ही जगभरातील संस्थांसोबत काम करतो. अमेरिकेत आम्ही अनेक अशी स्व-मूल्यांकन टूल आणली आहेत ज्यांची तपासणी डॉक्टरांनी केलेली आहे. एखादा वापरकर्ता मानसिक आरोग्याबद्दल माहिती शोधत असताना ही टूल्स त्यांच्या समोर येतात.

माहितीचे मूल्यांकन करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी टूल

एखाद्या वेबसाइटचे वर्णन, त्या वेबसाइटचे इंडेक्सिंग प्रथम कधी झाले आणि या स्रोताबद्दल आणि विषयाबद्दल इतर लोक काय म्हणतात ही सर्व माहिती त्या वेबसाइटवर जाण्यापूर्वीच तुम्हाला "या परिणामाबद्दल माहिती" ("About this result") या फीचरमध्ये मिळते. जर अशी उपयुक्त माहिती वेबवर उपलब्ध नसेल, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही यासाठी नंतर पुन्हा प्रयत्न करावा किंवा इतर प्रकारे शोध घ्यावा. एखाद्या झपाट्याने बदलत असणाऱ्या घटनेच्या वेळी असे घडू शकते जेव्हा त्यातील तथ्यांपेक्षा अधिक वेगाने त्यातील स्वारस्य जगात पसरत असेल, किंवा तुम्ही घेत असलेल्या शोधासाठी योग्य माहिती उपलब्धच नसेल त्यावेळी असे घडू शकते.

गोपनीयतेचे संरक्षण आणि डेटाची सुरक्षा

बिल्ट-इन तंत्रज्ञानाद्वारे विश्वसनीय माहिती पुरवून आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करून तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही दररोज काम करतो. आम्ही उद्योगातील आघाडीचे तंत्रज्ञान वापरून आणि प्रत्येक शोध एंक्रिप्ट करून तुमचा डेटा सुरक्षित करतो. तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज तुम्हाला निवडता यावीत, यासाठी आम्ही नियंत्रणे तयार करतो. तसेच तुमची वैयक्तिक माहिती आम्ही कधीही विकत नाही.