आरोग्यासंबंधित माहितीच्या दर्जेदार संसाधंनाची उपलब्धता

Google Health येथे, आम्ही प्रत्येकजणाला स्वतःसाठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी आरोग्यासंबंधी अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्याकरिता डिझाइन केलेली टूल आणि उपक्रमांचे उपयोजन करत आहोत. अधिकृत माहिती आणखी उपलब्ध करून, अधिक व्यापक वैज्ञानिक समुदायाला साहाय्य करून आणि Google च्या प्रभावी तंत्रज्ञानांचा फायदा घेऊन, अधिक निरोगी जीवन जगण्यात आम्ही लोकांना मदत करू शकतो.

बास्केटबॉल खेळणारी मुलगी आणि आई
Health Studies अ‍ॅपमधील स्क्रीन असलेल्या फोनचे ग्राफिक

तुमच्या समुदायाचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात तज्ञांना मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

आघाडीच्या संस्थांमधील आरोग्यविषयक अभ्यासामध्ये थेट तुमच्या फोनवरून सुरक्षितपणे भाग घ्या. अभ्यासाच्या निष्कर्षांचे पुनरावलोकन करा आणि तुमचा आरोग्य डेटा संशोधकांना कशी मदत करत आहे ते पहा. दर आठवड्याला फक्त एक मिनिट देऊन, तुम्ही आरोग्य सेवेसंबंधी संशोधनामध्ये सुधारणा करण्यात मदत करू शकता.

आरोग्य सेवेसंबंधित अपॉइंटमेंटची उपलब्धता आणि विमा फिल्टर दाखवणार्‍या Google Search च्या स्क्रीन असलेल्या फोनचे ग्राफिक

सर्वांसाठी आरोग्यासंबंधित माहिती आणि सेवा सहज उपलब्ध करणे

कोणत्या आरोग्य सेवा प्रदात्याकडे अपॉइंटमेंट उपलब्ध आहेत, ते कोणती विमा नेटवर्क स्वीकारू शकतात आणि कमी त्रासात योग्य सेवा शोधण्यात लोकांना मदत करण्यासाठी इतर माहिती दाखवण्याकरिता, आम्ही Google Search वर वैशिष्ट्ये जोडत आहोत. अनेक लोक सेवा मिळवण्याच्या दिशेने त्यांचा विशेष प्रवास सुरू करण्यासाठी Search कडे वळत असल्यामुळे, सर्वांसाठी आरोग्य सेवा अधिक सहजतेने उपलब्ध करून, त्यांना योग्य क्षणी उपयुक्त आणि अधिकृत माहिती देणे हे आमचे ध्येय आहे. अधिक जाणून घेण्यासाठी पहा

पार्कमध्ये सायकल चालवणारी महिला

मानसिक आरोग्यासाठी स्व-तपासण्या

आम्ही Google Search वर मानसिक आरोग्यासाठी चिकित्सालयांनी प्रमाणित केलेल्या स्व-तपासण्या सुरू केल्या आहेत, ज्या एखाद्या व्यक्तीने PTSD सारख्या मानसिक आरोग्य विकारांशी संबंधित माहिती शोधल्यावर दिसतात. वापरकर्त्याच्या प्रतिसादानुसार, ही टूल, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य सेवेसाठीचे योग्य स्रोत आणि सपोर्ट पर्यायाच्या लिंक व्यक्तींना ठरावीक मानसिक विकारांशी संबंधित लक्षणे आहेत का हे समजून घेण्यात मदत करतात.

आरोग्यासंबंधी अचूक आणि उपयुक्त माहिती

आम्ही आरोग्याविषयी विचारपूर्वक निर्णय घेण्यात लोकांना मदत करण्यासाठी Search, Maps आणि YouTube यांसारख्या संपूर्ण Google उत्पादनांची गुणवत्ता व विविधतापूर्ण आरोग्याशी संबंधित सामग्री, तसेच आरोग्य सेवेचे पर्याय मिळविण्याच्या सुविधेमध्ये वाढ करत आहोत. आमची टीम आवश्यकतेनुसार, लोकांना हवी असलेली आरोग्य सेवेसंबंधित माहिती शोधण्यात मदत करण्यासाठी तंत्रज्ञान वापरण्यास उत्सूक आहे.

तुमची गोपनीयता महत्त्वाची आहे

तुम्ही Google Health उत्पादने आणि सेवा वापरता, तेव्हा तुमचा डेटा खाजगी व सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी असते. तसेच Google Health मध्ये आम्ही कठोर गोपनीयता व सुरक्षा तत्त्वांचे पालन करतो, जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवू शकाल अशी उत्पादने आणि सेवा वितरित करू शकू.