आरोग्य सेवेसंबंधी संशोधन आणि तंत्रज्ञानामधील प्रगती

आमची चिकित्सक, संशोधक आणि इंजिनियर यांची संपूर्ण टीम एकत्रितपणे दीर्घकालीन आरोग्य तंत्रज्ञान क्षमता प्रत्यक्षात आणण्याकरिता नवीन AI तयार करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर आरोग्य सेवा तंत्रज्ञानांची उपलब्धता आणि अचूकता वाढवण्याच्या संधी शोधण्यासाठी काम करत आहे.

गवतावर बसलेला पुरुष आणि महिला

वैद्यकीय डोमेनसाठी डिझाइन केलेले आमचे लार्ज लँग्वेज मॉडेल Med-PaLM 2 सादर आहे

वैद्यकीय प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकणारे AI विकसित करणे हे अनेक दशकांपासून आव्हान होते. वैद्यकीय डोमेनसाठी सुधारणा केलेली PaLM 2 ची Med-PaLM 2 ही आवृत्ती वापरून वैद्यकीय परवाना देण्याच्या परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे देण्यामध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून परफॉर्मन्स दाखवला. संपूर्ण मानवी मूल्यमापनासह, आम्ही प्रतिसादांचा मसुदा तयार करून, दस्तऐवजांचा सारांश देऊन आणि इनसाइट देऊन Med-PaLM 2 हे आरोग्य सेवा संस्थांना कशी मदत करू शकते हे शोधत आहोत. अधिक जाणून घ्या.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये AI च्या वापराचा विस्तार करणे

जगभरातील डॉक्टरांची कमतरता तसेच जगाच्या काही भागांमध्ये आधुनिक इमेजिंग आणि निदान साधनांचा कमी उपलब्धता भरून काढण्यासाठी आम्ही AI मॉडेल तयार आणि चाचणी करत आहोत. सुधारित तंत्रज्ञानामुळे, आम्ही उपलब्धता वाढवू आणि अधिक रुग्णांना वेळेवर व अचूक निदानासह आरोग्य सेवा देण्यात मदत करू अशी आशा करतो.

DeepVariant हा जीनसंचाच्या विश्लेषणाच्या अचूकतेमध्ये कशी सुधारणा करत आहे

जीनसंच अनुक्रमित केल्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीच्या DNA मधील स्तनांच्या कर्करोगाच्या वाढीव धोक्यासारखे जनुकीय विकार दर्शवणारे व्हेरीयंट ओळखू शकतो. DeepVariant हा पुढील पिढीमधील DNA अनुक्रमण डेटामधील जनुकीय व्हेरीयंट ओळखण्यासाठी डीप न्‍यूरल नेटवर्क वापरणारा मुक्त स्रोत व्हेरीयंट कॉलर आहे.

मिठी मारणारे वडील आणि मुलगी

वैज्ञानिकांच्या नेतृत्वातील, Google ने वर्धित केलेले आरोग्य सेवेसंबंधी संशोधन

Google Health हे भागीदारांना डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांना संशोधन करण्यात तसेच आमच्या आरोग्याच्या आकलनामध्ये सुधारणा करण्यात मदत करणारे सुरक्षित तंत्रज्ञान पुरवत आहे. संशोधक म्हणून तुम्हाला आरोग्यासंबंधी संशोधन करण्यासाठी Google Health सोबत काम करण्यात रस असल्यास, Google Health हे संशोधन भागीदारीसाठी उपलब्ध असताना सूचना मिळवण्यासाठी, तुमचे तपशील प्रविष्ट करा.

प्राणघातक आजारांबाबत डॉक्टरना आधीच सुरुवात करण्यासाठी ४८ तास देण्यासाठी AI वापरणे

नेचर मधील या संशोधनामध्ये आम्ही दाखवून दिले की आर्टिफिश्यल इंटेलिजेंस ही रुग्णांमधील मूत्रपिंडाच्या तीव्र दुखापतींच्या (AKI) सध्या केल्या जाणार्‍या निदानापेक्षा कमाल ४८ तास लवकर अचूकपणे पूर्वानुमान कसे करू शकते. शोधण्यासाठी अत्यंत कठीण असलेल्या AKI या अमेरिका आणि इंग्लंड मध्ये रुग्णालयात भरती झालेल्या पाच रुग्णांपैकी एका रुग्णावर परिणाम करतात आणि त्याची प्रकृती झपाट्याने बिघडू शकते.लेख वाचा

डीप लर्निंग

रुग्णांचे संरक्षण करणे

डीप लर्निंग

आरोग्यविषयक इलेक्ट्रॉनिक माहितीसाठी डीप लर्निंग

npj डिजिटल मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधामध्ये, आम्ही ओळख काढून टाकलेली आरोग्यविषयक इलेक्ट्रॉनिक माहिती वापरून, रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त असलेल्या पूर्वानुमानांचा विस्तृत संच तयार करण्याकरिता डीप लर्निंग मॉडेल वापरली आणि दाखवले, की पेशंटला रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ तासांनी अचूक पूर्वानुमान करण्यासाठी ते मॉडेल वापरले जाऊ शकते. लेख वाचा

रुग्णांचे संरक्षण करणे

औषधोपचारांमधील चुकांपासून रुग्णांचे संरक्षण करणे

संशोधन दाखवते, की रुग्णालयात भरती केलेले २% रुग्ण रोखता येणार्‍या, औषधोपचारांशी संबंधित गंभीर घटना अनुभवतात, ज्या प्राणघातक असू शकतात, कायमची इजा करू शकतात किंवा ज्यांमुळे मृत्यू होऊ शकतो. क्लिनिकल फार्मॉलॉजी अँड थेरप्यूटिक्स मध्ये प्रकाशित झालेले, आमचे सर्वोत्कृष्ट रीतीने परफॉर्म करणारे AI मॉडेल हे ओळख काढून टाकलेली आरोग्यविषयक इलेक्ट्रॉनिक माहिती आणि डॉक्टरच्या प्रिस्क्रायबिंग रेकॉर्डच्या आधारावर चिकित्सकाच्या प्रिस्क्रायबिंगसंबंधी प्रत्यक्ष निर्णयाचा ७५% वेळा अंदाज करू शकले. चुका रोखणे आणि रुग्णांना सुरक्षित ठेवण्यात मदत करणे अशा पद्धतीने मशीन लर्निंग चिकित्सकांना सपोर्ट करू शकते या परिकल्पनेची चाचणी करण्याच्या दिशेने हे लवकर टाकलेले पाऊल आहे. लेख वाचा

नवीनतम गोष्टी शोधा

Google चे आरोग्याशी संबंधित संशोधन आणि उपक्रम यांमधून आमच्या सर्वात अलीकडील विकासांबद्दल अधिक जाणून घ्या.

AI मुळे विज्ञान आणि वैद्यकाची कशी प्रगती होत आहे

वैज्ञानिक, डॉक्टर आणि या क्षेत्रातील इतर लोकांसोबत काम करून, Google मधील संशोधक हे वैद्यक व विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यात तंत्रज्ञाने मदत करू शकतील असे मार्ग शोधत आहे. या व्हिडिओमध्ये, आम्ही मोठ्या शक्यता असणारे काही संशोधन प्रोजेक्ट शेअर करत आहोत.

आम्ही आरोग्याबाबत सातत्याने नवीन संशोधन प्रकाशित करत आहोत