स्मार्टफोनच्या सेन्सरचा वापर करून आरोग्यासंबंधी माहिती गोळा केली जाते

आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती गोळा करणारे असे सेन्सिंग तंत्रज्ञान आम्ही तयार करत आहोत जे जगातील सर्व प्रकारच्या स्मार्टफोनवर काम करू शकेल. लोकांकडे आधीपासून असलेल्या डिव्हाइसवर आरोग्यविषयक माहिती सुलभ करून आपण आरोग्यसेवेची उपलब्धता सर्वांसाठी वाढवू शकतो.

विविध प्रकारचे सर्व सेन्सर दाखवणाऱ्या फोनचे इलस्ट्रेशन.
विशेष आरोग्य उपकरणे

काही आरोग्यविषयक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अजूनही विशेष उपकरणांची गरज आहे

लोकांना स्वतःच्या आरोग्याबद्दल काही विशेष माहिती पाहिजे असल्यास त्यांना अशा दवाखान्यात किंवा क्लिनिकमध्ये जावे लागते जिथे विशेष उपकरणे असतील किंवा त्यांच्याकडे अंगावर घातल्या जाणाऱ्या डिव्हाइस किंवा घरगुती आरोग्य उपकरणे असली पाहिजेत. त्यामुळे आरोग्यातील बदल कळणे जगातील अनेक लोकांच्या आवाक्याबाहेर असते, विशेषतः संसाधने कमी असलेल्या ठिकाणी हे अधिक जाणवते.

स्मार्टफोन सेन्सर

महत्त्वाचे आरोग्य सिग्नल गोळा करून त्यांचे विश्लेषण करू शकणारे स्मार्टफोन सेन्सर

जागतिक दर्जाच्या मशीन लर्निंग कौशल्याबरोबरच मूलभूत हार्डवेअरचे आमचे सखोल ज्ञान आमच्या संशोधक, इंजिनिअर्स आणि चिकित्सकांच्या टीमला असे AI सेन्सर तयार करण्यात मदत करते जे लोकांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गरजेची असलेली माहिती आणि इनसाइट देतात. ही मोजमापे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केली जातात, पण ही वैद्यकीय निदानासाठी किंवा वैद्यकीय स्थितींचे मूल्यांकन करण्यासाठी नाहीत.

Pixel डिव्हाइसवर खोकला आणि घोरणे याची माहिती

Pixel डिव्हाइसवर खोकला आणि घोरणे याची माहिती

खोकला आणि घोरणे यासारख्या गोष्टी तुमच्या झोपेवर परिणाम करतात का हे समजून घेण्यात Pixel तुम्हाला मदत करू शकते. या वैशिष्ट्यामध्ये Pixel च्या मायक्रोफोनचा वापर केला जातो आणि कुठल्याही प्रकारचे रेकॉर्डिंग किंवा डेटा शेअरिंग केले जात नाही. बेडटाइम समरी म्हणजेच झोपण्याच्या वेळेचा सारांश या स्क्रीनवर Pixel तुम्हाला दाखवतो की तुम्ही झोपेत असताना किती वेळ घोरलात आणि या दरम्यान तुम्हाला खोकला किती वेळा आला.

हृदय आणि श्वसनाच्या रेटची इमेज

हृदयाचे ठोके आणि श्वसनाचा दर

तुमच्या आरोग्याची आणि स्वास्थ्याची तपासणी करताना हृदयाच्या ठोक्यांचा आणि श्वसनाचा दर ही दोन महत्त्वाची लक्षणे साधारणपणे वापरली जातात. Android आणि iOS वर Google Fit अ‍ॅप वापरून तुम्ही फक्त तुमच्या फोनच्या कॅमेऱ्यावरून तुमच्या हृदयाचे ठोके व श्वसनाचा दर मोजू शकता.

ही दोन्ही वैशिष्ट्ये आम्ही अशा प्रकारे तयार केली आहेत — आणि ती योग्य प्रकारे काम करतात याची चाचणी करण्यासाठी चिकित्सालयीन अभ्यास पूर्ण केले आहेत — की ही वास्तविक जगामध्ये आणि विविध लोकांसाठी काम करू शकतील. उदाहरणार्थ, आम्ही हृदयाचे ठोके मोजण्यासाठी जी अल्गोरिदम वापरतो, ती एखाद्या व्यक्तीच्या बोटाच्या टोकावरील बदलत्या रंगाच्या आधारे रक्ताच्या प्रवाहाचा अंदाज लावते, त्यामुळे यामध्ये तेथील प्रकाश, त्वचेचा रंग, वय आणि असे इतर बरेच घटक विचारात घेतले जातात.

Nest Hub वर Sleep Sensing

Sleep Sensing मध्ये Motion Sense वापरून याचे विश्लेषण केले जाते की डिस्प्लेच्या सर्वात जवळच्या व्यक्तीची झोप कशी होते आहे. यासाठी त्या व्यक्तीच्या हालचाली आणि श्वसन यांवर लक्ष दिले जाते. Sleep Sensing मध्ये खोकला आणि घोरणे, तसेच खोलीतील प्रकाश आणि तापमानातील बदल यासारख्या झोपेवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टीही कळतात. अशाने तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळते की तुमच्या झोपेवर कशाचा परिणाम होतो आहे.

Sleep Sensing तयार करताना तुमच्या गोपनयतेकडे खास लक्ष दिले गेले आहे. Motion Sense मध्ये फक्त हालचाली झालेल्या कळतात, शरीर किंवा चेहऱ्याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच तुमच्या खोकल्याचा आणि घोरण्याच्या आवाजाचा डेटा फक्त त्या डिव्हाइसवरच प्रोसेस केला जातो. Sleep Sensing ची वैशिष्ट्ये बंद करण्यासाठी तुम्ही अनेक नियंत्रणे वापरू शकात, यामध्ये एक हार्डवेअर स्विचसुद्धा असते ज्याने तुम्ही मायक्रोफोनचे बटण बंद करू शकता. तुम्ही केव्हाही तुमच्या झोपेचा डेटा पाहू किंवा डिलीट करू शकता आणि आमच्या गोपनीयतेसंबंधी वचनबद्धतेप्रमाणे, या डेटाचा वापर जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी केला जात नाही.

गोपनीयतेचे संरक्षण करणाऱ्या सेन्सरमधून नवीन माहिती मिळवण्यासाठी अभिनव संशोधन

संसाधनांची कमतरता असलेल्या क्षेत्रांमध्ये हृदय व रक्तवाहिनीचे विकार अकाली मृत्यूसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात. लवकर निदान आणि उपचार करणे फार महत्त्वाचे असते, तरीही सध्याच्या अनेक रिस्क स्कोअरसाठी शारीरिक तपासणी किंवा प्रयोगशाळेतील मोजमापे गरजेची असतात. आरोग्यसेवा आणि इतर सोयींच्या अभावामुळे हे एक आव्हान ठरू शकते. आम्ही डीप लर्निंग वापरून PPG-आधारित रिस्क स्कोअर तयार केला आहे ज्यावरून असे PPG सेन्सिंग तंत्रज्ञान वापरण्याची शक्यता तपासली जाऊ शकते, जे तंत्रज्ञान आमच्या यापूर्वीच्या संशोधनामुळे बहुतांश स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. यामुळे कमी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी करता येऊ शकते. या संशोधनामुळे, संसाधनांची कमतरता असलेल्या क्षेत्रांमध्ये हृदय व रक्तवाहिनीच्या विकारांसाठी जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी स्मार्टफोनचा उपयोग केला जाऊ शकेल यासाठी तंत्रज्ञानाचा पाया घातला गेला आहे.