Health Connect by Android

तुमच्या आवडत्या अ‍ॅप आणि डिव्हाइसदरम्यान डेटा शेअर करा

तुमच्या आवडत्या अ‍ॅपवर अधिक समृद्ध अनुभव आणि इनसाइट मिळवा. तुमच्या निरनिराळ्या अ‍ॅपदरम्यान डेटा शेअर केल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्य आणि फिटनेसचे एकत्रित स्वरूप पहायला मिळेल आणि तुम्हाला समजेल की तुमच्या जीवनशैलीचा यावर कसा परिणाम होतो, मग तुमचे लक्ष अ‍ॅक्टिव्हिटीवर असो किंवा झोपेवर, पोषक आहारावर असो किंवा शरीराच्या महत्त्वाच्या चिह्नांवर.

कुत्र्यासोबत उभी असलेली महिला, जी स्क्रीनवरील अ‍ॅप पाहत आहे
स्व-तपासणीच्या उदाहरणासह फोनचे ग्राफिक

आरोग्य आणि फिटनेससंबंधी डेटा व्यवस्थापित करण्याची सर्व साधने एकाच ठिकाणी

तुमच्या मोबाइल फोनच्या सेटिंगमधील मुख्य डॅशबोर्ड दाखवतो की तुम्ही तुमचा कोणता डेटा कोणासोबत शेअर करत आहात. तुम्ही केव्हाही हे शेअर करणे बंद करू शकता आणि असा डेटा डिलीट करू शकता जो तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर नको असेल. एकापेक्षा अधिक अ‍ॅप वापरत असताना डेटाच्या कुठल्या स्रोताला अधिक प्राधान्य दिले जावे हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता.

स्व-तपासणीच्या उदाहरणासह फोनचे ग्राफिक

गोपनीयता आणि सुरक्षा या गोष्टी Health Connect च्या केंद्रस्थानी आहेत

गोपनीयतेसोबत तडजोड न करता आरोग्य आणि फिटनेसच्या निरनिराळ्या अ‍ॅपदरम्यान तुमचा डेटा स्टोअर आणि कनेक्ट करण्याचा सोपा मार्ग Health Connect तुम्हाला देते. तुमचा डेटा कोणासोबत शेअर केला जावा आणि कोणत्या प्रकारचा डेटा शेअर केला जावा हे तुम्ही ठरवू शकता.

डेव्हलपरना Android वापरकर्त्यांसाठी आणखी समृद्ध अनुभव तयार करू देणे

वापरकर्त्यांची परवानगी घेऊन, Health Connect वापरून अनेक अ‍ॅप व डिव्हाइसमधील डेटाला डेव्हलपर सुरक्षितपणे अ‍ॅक्सेस करू शकतात आणि त्यासाठी त्यांना API चा एकच संच आणि एक मानक डेटा स्कीमा वापरायचा असतो.

अ‍ॅपचे एकाहून अधिक आयकन असलेली इमेज

Health Connect सोबत इंटीग्रेट होणारे अ‍ॅप

आघाडीचे आरोग्य आणि फिटनेस ॲप आता Health Connect वापरतात, त्यामुळे तुम्ही तुमचा डेटा त्या ॲपदरम्यान शेअर करू शकता. यापैकी महत्त्वाच्या ॲपची यादी पहा.

Android Health Connect बद्दल लोकांचे काय मत आहे