तुमचे त्वचा विकार ओळखण्यात मदत करण्याचा पूर्णपणे नवीन मार्ग
काही प्रश्न आणि तीन झटपट फोटोनंतर तुमच्या त्वचेच्या समस्यांबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती शोधण्यात मदत करणारे DermAssist हे Google Health चे मार्गदर्शित त्वचा शोध अॅप वापरून, काही मिनिटांत त्वचा विकारांबद्दल अधिक जाणून घ्या.
DermAssist हे वर्ग १ वैद्यकीय डिव्हाइस म्हणून CE मार्क केलेले आहे आणि मर्यादित रिलीझद्वारे सध्या त्यावर मार्केटसंबंधी आणखी चाचण्या केल्या जात आहेत. तुम्हाला DermAssist वापरून पाहण्यात स्वारस्य असल्यास, तुमच्या प्रदेशात टूल उपलब्ध झाल्यावर सूचना मिळवण्यासाठी किंवा आमच्या संशोधनामध्ये योगदान देण्यासाठी, येथे साइन अप करा.
जगभरातील दोन अब्ज लोकांना त्वचा, केस आणि नखांसंबंधित समस्या आहेत
Google वर, आम्ही दरवर्षी त्वचेशी संबंधित अब्जावधी शोध पाहतो. माहिती संगतवार लावण्याची आमची निपुणता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भागीदारांच्या सहयोगाद्वारे, त्वचेच्या समस्यांविषयी माहिती मिळण्यासाठी शोधासंबंधित मार्गदर्शन करण्यात मदत करण्याकरिता आम्ही DermAssist तयार करत आहोत.
DermAssist हे सर्वांना वापरता यावे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यामध्ये त्वचेचा रंग, तिचा प्रकार आणि आणखी बऱ्याच गोष्टींच्या समावेशासह DermAssist हे अचूकपणे काम करते याची खात्री करणे समाविष्ट आहे.
DermAssist कसे काम करते
तुमच्या त्वचेबद्दलची माहिती सबमिट करा
तुमच्या फोन किंवा कॉंप्युटरवरून तुमच्या त्वचा विकाराचे तीन फोटो अपलोड करा आणि काही प्रश्नांची उत्तरे द्या. त्वचेसंबंधित कोट्यवधी इमेजमधून जे शिकले आहे ते वापरून DermAssist हे तुमच्या सबमिट केलेल्या फोटो आणि माहितीमध्ये विविध त्वचा विकारांची लक्षणे शोधते.
एका मिनिटाच्या आत परिणाम मिळवा
काही सेकंदांमध्ये, DermAssist हे जुळणाऱ्या संभाव्य त्वचा विकारांची सूची आणि त्या प्रत्येकाविषयी उपयुक्त माहिती तुम्हाला पुरवते.
DermAssist हे कुणाच्या वापरण्यासाठी डिझाइन केले आहे…
- १६ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक
- वैद्यकीय निदान न शोधणारे लोक
त्वचा, केस आणि नखांसंबंधित २८८ विकार ओळखते
त्वचारोगतज्ञांच्या मदतीने तयार केले आहे
DermAssist हे मशीन लर्निंग संशोधन, त्वचारोगतज्ञांनी पुनरावलोकन केलेला मजकूर, वापरकर्त्यांनी केलेली चाचणी आणि उत्पादन विकास यांवर केलेल्या अनेक वर्षांच्या कामाचा परिणाम आहे. आमच्या इमेज शोध तंत्रज्ञानामध्ये सातत्याने सुधारणा होत आहे आणि आम्ही आमचा मूलभूत संशोधन लेख यापासून खूप प्रगती केली आहे.
सर्वसमावेशक होण्यासाठी तयार केले आहे
त्वचेच्या कोट्यवधी इमेज वापरून प्रशिक्षित केलेले DermAssist हे सर्वसामान्यपणे शोधल्या जाणाऱ्या त्वचा विकारांपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त विकार ओळखू शकते आणि संशोधन असे दर्शवते, की सर्व लोकांमधील त्वचा विकार आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यात मूलभूत तंत्रज्ञान चिकित्सकांना मदत करू शकते.
DermAssist ची चाचणीद्वारे पडताळणी केलेली आहे
ईयूमध्ये DermAssist हे वर्ग १ वैद्यकीय डिव्हाइस म्हणून CE मार्क केले आहे. आमच्या संशोधन आणि उत्पादन विकासाला मार्गदर्शन करण्यासाठी, गोळा केलेल्या डेटाचे पुनरावलोकन करण्यासाठी, उत्पादनाच्या परफॉर्मन्सची पडताळणी करण्यासाठी व नियामक आवश्यकतांचे पालन करण्यासाठी आम्ही विविध भागीदार आणि चिकित्सकांसोबत काम करतो.
आरोग्य समन्यायासाठी आमची वचनबद्धता
प्रत्येकाला त्याच्या त्वचा विकारांबद्दल उपयुक्त, अचूक माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. निष्पक्ष मार्गाने DermAssist तयार करण्यासाठी आम्ही विविध पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांकरिता काम करणाऱ्या संस्था आणि चिकित्सकांसोबत भागीदारी करत आहोत. यामध्ये आमचे तंत्रज्ञान हे विविध त्वचा रंगांच्या आणि तिच्या प्रकारांच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहे याची खात्री करणे, तसेच आरोग्य समन्यायावर DermAssist च्या प्रभावाचे संशोधन करणे यांचा समावेश आहे.
डेटा गोपनीयता, वापरकर्ता नियंत्रण आणि पारदर्शकता यांना आम्ही प्राधान्य देतो
डेटा कशा प्रकारे शेअर केला जावा किंवा जाऊ नये यावर नेहमीच वापरकर्त्यांचे नियंत्रण असते.
DermAssist तुमची माहिती जाहिरातीच्या उद्देशांसाठी वापरत नाही.
सर्व डेटा सुरक्षितपणे स्टोअर केला जातो आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी एंक्रिप्ट केला जातो.
त्वचेसंबंधी समस्या ओळखण्यात DermAssist कशी मदत करते त्याबद्दल अधिक जाणून घ्या
Google च्या मुख्य अधिकारी, डॉ. कॅरन डिसाल्व्हो या DermAssist हे तुमच्या त्वचेसंबंधी समस्या समजून घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कसे वापरते ते समजावून सांगताहेत.