वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Google Health शी संबंधित उत्तरे शोधण्यासाठी सामान्यतः विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या संग्रहातून ब्राउझ करा.

Google Health म्हणजे काय?

Google Health हे कनेक्ट होणारी आणि आरोग्यासंबंधी माहितीला अर्थ मिळवून देणारी उत्पादने व सेवा यांमार्फत अब्जावधी लोकांना अधिक निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. Google Health हे सेवा टीम यांना अधिक चांगली, अधिक जलद आणि अधिक कनेक्टेड सेवा देता येण्यासाठी तंत्रज्ञान निराकरणे डेव्हलप करण्यावर लक्ष केंद्रित करते. अधिक निरोगी राहण्यास लोकांना सक्षम करणे यासाठी, त्यांच्या आरोग्याबाबत कृती करण्याकरिता त्यांना आवश्यक असलेली माहिती, साहाय्य आणि संबंध यांसह, आम्ही उत्पादने आणि वैशिष्ट्यांवर काम करत आहोत. तसेच कर्करोगाचे निदान करणे, रुग्णाच्या स्थितीचे पूर्वानुमान करणे, अंधत्वाला प्रतिबंध करणे आणि बरेच काही करण्यात साहाय्य करण्यासाठी, Google Health हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याचा वापर एक्सप्लोर करत आहे. जगातील माहिती संगतवार लावणे आणि ती जगभर अ‍ॅक्सेसिबल व उपयुक्त बनवणे या Google च्या ध्येयाला आमचे काम पूरक आहे.

Google Health उत्पादने कोणती आहेत?

आमच्या टीम उत्पादने किंवा निराकरणांबाबतचे आमचे कौशल्य चार प्रमुख क्षेत्रांमध्ये लागू करत आहेत:

  • ग्राहक यांसाठी Search, Maps, YouTube, Fitbit, Fit आणि Nest यांसारख्या उत्पादनांमध्ये लोकांना त्यांचे आरोग्य आणि स्वास्थ्य व्यवस्थापित करण्यात मदत करण्याकरिता उच्च गुणवत्तेची माहिती आणि साधनांसह.
  • सेवादाते यांसाठी Google Cloud चे Healthcare Data Engine आणि Care Studio यांसारख्या उत्पादनांंमध्ये, सेवा देणे रूपांतरित करण्यासंबंधीच्या निराकरणांसह.
  • सेवादाते यांसाठी संशोधनाद्वारे रोगाचे स्क्रीनिंग आणि निदान यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उत्प्रेरित करण्याकरिता डायबेटिक रेटिनोपॅथी विकारासाठी ARDA यासारखी उत्पादने व मॅमोग्राफी, त्वचारोगशास्त्र आणि क्षयरोग स्क्रीनिंग यांमधील अन्वेषणे यांसह.
  • निरोगी समुदाय यांसाठी सार्वजनिक आरोग्य समुदायाकरिता डेटा आणि इनसाइटसह, जेणेकरून त्यांना लागणीबद्दलच्या सूचना, समुदाय मोबिलिटी अहवाल, आरोग्य समन्याय ट्रॅकर व Google.Org AdGrants यांसारखी टूल वापरून, लोक जेथे राहतात, काम करतात आणि खेळतात ते पर्यावरण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

Google आरोग्य सेवा विभाग आहे का?

Google Health हा कनेक्ट होणारी आणि आरोग्यासंबंधी माहितीला अर्थ मिळवून देणारी उत्पादने व सेवा यांमार्फत अब्जावधी लोकांना अधिक निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी कंपनीव्यापी प्रयत्न आहे. Google Health हे व्यक्ती आणि आरोग्य सेवा पुरवठादार या दोघांनाही मदत केरण्यासाठी डिझाइन केलेले असले तरी, आज Google मध्ये "Google आरोग्य सेवा" विभाग किंवा प्लॅटफॉर्म नाही.

Google माझी आरोग्य सेवेसंबंधी माहिती गोळा करते का?

तुम्ही Google ची उत्पादने आणि सेवा वापरता तेव्हा, तुमच्या डेटा बाबत आमच्यावर विश्वास ठेवता. तुमचा डेटा खाजगी आणि सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. तसेच Google Health येथे, आम्ही नवीन उत्पादने आणि सेवा तयार करत असताना आम्हाला गोपनीयता व सुरक्षेची पायाभूत तत्त्वे मार्गदर्शन करतात. अधिक जाणून घेण्यासाठी, सुरक्षितता केंद्र येथे भेट द्या.

Google Health ची वैद्यकीय रेकॉर्ड असतात का?

नाही. Google Health चे Care Studio हे वैद्यकीय रेकॉर्ड पुरवत नाही. ते आरोग्य सेवा पुरवठादाराच्या इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (EHR) यामध्ये आधीपासूनच असलेली माहिती घेते आणि ती EHR वापरणार्‍या चिकित्सकांना नवीन मार्गाने पुरवते. हे उत्पादन HIPAA सह, रुग्णाच्या डेटाचे संरक्षण करणार्‍या आणि डेटा कसा वापरला जाऊ शकतो व त्यावर प्रक्रिया कशी केली जाऊ शकते हे संचालित करणार्‍या उद्योगव्यापी नियमनांचे पालन करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. माहितीचे संरक्षण करण्यासाठी, आम्ही प्रशासकीय, तांत्रिक आणि भौतिक संरक्षक योजनांची अंमलबजावणी करतो.

Google Health Studies म्हणजे काय?

Google Health Studies हे एक अ‍ॅप आहे, जे फक्त तुमच्या फोनवरून आणि सुरक्षितपणे आघाडीच्या संस्थासोबत आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या संशोधनामध्ये योगदान देण्यास तुम्हाला सक्षम करते.

Google Health संशोधन आणि Google वैद्यकीय संशोधन यांची उदाहरणे कोणती आहेत?

Google Health हे दीर्घकालीन आरोग्य तंत्रज्ञान क्षमता प्रत्यक्षात आणण्याकरिता नवीन AI तयार करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर आरोग्य सेवा तंत्रज्ञानांची उपलब्धता व अचूकता वाढवण्याच्या संधी शोधण्यासाठी काम करत आहे. मधुमेही दृष्टिपटल विकारासाठी ARDA यासारखी उत्पादने, मॅमोग्राफी, त्वचारोगशास्त्र आणि क्षयरोग स्क्रीनिंग यांमधील अन्वेषणे व बर्‍याच गोष्टी यांसह रोगाचे स्क्रीनिंग आणि निदान यांद्वारे आम्ही हे करत आहोत.

Google Health Deepmind चे काय झाले?

Deepmind हे विज्ञानामध्ये प्रगती करून मानवतेचा फायदा करून देण्यासाठी, बुद्धिमत्तेचे निराकरण करण्याकरिता वचनबद्ध आहे. Google ने २०१४ मध्ये DeepMind मिळवले.

Fitbit हे Google Health चा भाग आहे का?

Fitbit हे अधिक निरोगी, अधिक सक्रिय जीवन जगण्यात लोकांना मदत करण्यासाठी समर्पित आहे. Google ने २०२१ मध्ये Fitbit मिळवले.

Google Health संबंधी नवीनतम बातम्या मला कुठे सापडू शकतील?

Google Health संबंधी नवीनतम बातम्या The Keyword या Google Health ब्लॉगवर सापडू शकतात.

Google चे DermAssist टूल काय आहे?

DermAssist हे Google Health चे नियमनित त्वचा शोध अ‍ॅप आहे, जे काही प्रश्न आणि तीन झटपट फोटोनंतर त्वचेच्या समस्यांबद्दल त्वचारोगशास्त्रासंबंधी पर्सनलाइझ केलेली माहिती शोधण्यात वापरकर्त्यांना मदत करते आणि ते मर्यादित रिलीझद्वारे ठरावीक प्रदेशांत उपलब्ध करून दिले जाईल. DermAssist हे सध्या युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध नाही.

Google Health हे त्वचा विकारांचे निदान करते का?

DermAssist हे फक्त माहिती देण्याच्या उद्देशांसाठी आहे आणि ते वैद्यकीय निदान पुरवत नाही.

Google Health अजून अस्तित्वात आहे का?

Google Health हे बंद होत नसून, ते कनेक्ट होणारी आणि आरोग्यासंबंधी माहितीला अर्थ मिळवून देणारी उत्पादने व सेवा यांमार्फत अब्जावधी लोकांना अधिक निरोगी राहण्यात मदत करण्याच्या त्याच्या ध्येयावर पुढे जात आहे.

Google Health अयशस्वी का झाले?

Google Health हे कनेक्ट होण्यासाठी आणि आरोग्यासंबंधी माहितीला अर्थ मिळवून देण्यासाठी, नवीन उत्पादने, सेवा, अनुभव व संशोधन रिलीझ करणे सुरू ठेवत आहे.

Google Health चे काय झाले?

Google Health हा सेवा टीमना अधिक चांगली, अधिक जलद आणि अधिक कनेक्टेड सेवा देता यावी यासाठी तंत्रज्ञान निराकरणे डेव्हलप करणे, लोकांच्या आरोग्याबाबत कृती करण्याकरिता त्यांना आवश्यक असलेली माहिती, साहाय्य आणि संबंध यांसह त्यांना अधिक निरोगी राहण्यास सक्षम करणे, तसेच कर्करोगाचे निदान करणे, रुग्णाच्या स्थितीचे पूर्वानुमान करणे, अंधत्वाला प्रतिबंध करणे आणि बरेच काही करण्यात साहाय्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर एक्सप्लोर करणे यांसाठीचा कंपनीव्यापी प्रयत्न आहे.